Mumbai News : राज्यात महिला मुख्यमंत्री चेहऱ्यावर चर्चा होऊ लागली आहे. महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर कोणाला मुख्यमंत्रीपद मिळणार, यावर चर्चा सुरू असतानाच काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री महिला चेहऱ्याबाबत मोठं विधान केलं आहे.
"राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे सुप्रिया सुळेंचा चेहरा आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे रश्मी ठाकरे आहेत. तर काँग्रेसमध्येही चेहरे आहेत, असे सांगून मविआमधील कोणत्याही पक्षाची महिला मुख्यमंत्री झाल्यास आनंद होईल", असं सांगत 'मविआ'त महिलां नेत्यांचा सन्मान होतो. पण भाजपमध्ये एकाही महिला मंत्रिपद नाही, तर अध्यक्षपद देखील दिलं जात नाही, अशी तोफ काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांनी डागली.
काँग्रेस (Congress) खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्यातील बदलत्या राजकारणावर भाष्य केलं. महाराष्ट्रातील राजकारण स्वच्छ व्हावं, यासाठी गणपती बाप्पाला साकडं घातलं आहे. महाराष्ट्रातील राजकारणाला गलिच्छ किनार लागली असून, पैसे, गद्दारी सुरू झाली आहे. यामुळे लोकांमध्ये लोकप्रतिनिधींबाबत प्रश्न निर्माण झालेत. इतर राज्यात महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाविषयी दाखले दिले जायचे, आज गलिच्छ राजकारणाचे उदाहरण दिले जात असल्याचं वाईट वाटतं, असं खासदार गायकवाड यांनी म्हटलं.
राज्यात मुख्यमंत्री महिला चेहऱ्याबाबत चर्चा होत आहे. यावर वर्षा गायकवाड यांनी सावध प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "महिलांना 50 टक्के आरक्षण देणारं पहिलं राज्य कोणतं असेल, तर ते महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महिला मुख्यमंत्री चेहऱ्याची चर्चा होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडे सुप्रिय सुळे आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे रश्मी ठाकरे आहेत. काँग्रेसकडे देखील महिला चेहरे खूप आहेत. 'मविआ'तील कोणत्याही पक्षातील महिला मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यास सर्वात जास्त आनंद होईल". 'मविआ'मधील सर्व पक्षांकडून महिलां नेत्यांचा सन्मान केला जातो. त्या तुलनेत भाजपमध्ये महिलांना मंत्रिपद देखील दिलं जात नाही. पक्षाचं अध्यक्षपद देखील दिलं जात नाही, अशी कोपरखळी देखील वर्षा गायकवाड यांनी भाजपला लगावली.
महाराष्ट्रातील पक्ष फोडीच्या राजकारणावर देखील वर्षा गायकवाड यांनी चांगलेच फटकेबाजी केली. "'ईडी' आणि 'सीबीआय'चा महाराष्ट्रातील राजकारणात चांगलाच गैरवापर झाला. अजित पवार, ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, रवींद्र वायकर तिकडं जाताच त्यांचे 'क्लोजर रिपोर्ट' आले, ते कसे आले? यामिनी जाधवांपासून सगळ्यांना 'क्लीन चीट' मिळाली". विरोधकांनी आरोप केल्यावर त्यांना तुरुंगात डांबलं जाऊ लागलं. पक्षा आल्यावर त्यांना पवित्र करून घेऊ जाऊ लागलं. राजकारणात वैचारिकता असते. ती भाजपने महाराष्ट्रात संपवण्याचा घाट घातला आहे. पण आमची काँग्रेसची विचारधारा सर्वसमावेशक आहे. ती सोडणार नाही, असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.