Nagpur News: काँग्रेस पक्ष दिशाहीन झाला आहे. विकासावर कुठलाच नेते बोलत नाही. फेक नॅरेटिव्ह तयार करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. राहुल गांधी यांनी मतचोरी, ईव्हीएम हॅक असे आरोप करून फक्त हवा निर्माण केली. मात्र, बिहारच्या जनतेनी त्यांनाच खोटे ठरवले. त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले असं विधान भाजप नेते व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे. याचदरम्यान, ‘स्थानिक' निवडणुकीत भाजप महायुती 51 टक्के जागा घेऊन जिंकणार असल्याचा दावा कतेला.
महाराष्ट्रात एक पाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. बिहार राज्याच्या निवडणुकीचा निकालाचा परिणाम संपूर्ण देशावर होणार आहे. हे काही हवेतले वातावरण नाही. याचा फायदा निश्चितपणे महायुतीला होणार आहे.
बावनकुळे म्हणाले, काँग्रेस (Congress) रोजच संपत आहे. राहुल गांधी हतबल झाले आहे. फक्त मतदार यादीचे चुकीचे मुद्दे समोर करून वेळकाढूपणा करीत आहे. विकासाचा कुठलाच अजेंडा त्यांच्याकडे नाही. धर्म, जात पंथाचे राजकारण करणे हेच काँग्रेसचे काम आहे.
आता काँग्रेसच्या बुडत्या जहाजावर बसायला कोणी तयार नाही. काँग्रेसला जनतेने नाकारले आहे. बिहारमधून बाहेर काढले आहे. 2029 मध्ये काँग्रेस इतिहासातील सर्वात छोटा पक्ष होईल असेही ते म्हणाले
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, आता निकालानंतर काँग्रेस नेत्यांचे नेहमीचे रडगाणे सुरू झाले आहे. पक्षात शिल्लक असलेले कार्यकर्ते पक्षातच राहावे, संकुचित होत असलेली पार्टी वाचवावी यासाठी आता निवडणुकीनंतर आरोप-प्रत्यारोप होतील. आता पुन्हा ईव्हीएमचे खेळ खेळले जातील. आता तरी त्यांनी मतदानावर शंका घेऊ नये. जनतेने जो कौल दिला तो स्वीकारावा.
आम्ही अनेक दशक पराभूत होत होतो. मात्र, कधी ईव्हीएमवर आक्षेप घेतला नाही. प्रत्येक पराभवाचे आम्ही चिंतन केले. त्या मागची कारणे शोधून काढली. नव्याने निवडणुकीला सामोरे गेलो. तेव्हा कुठे हे दिवस आले. मात्र, काँग्रेसला चिंतन करायचे नाही. पराभूत झाल्यानंतर त्यांचा प्रमुख नेता विदेशात पळून जातो. त्यामुळे काँग्रेस संपत आली असल्याची प्रतिक्रिया बावनकुळे यांनी बिहारच्या निकालावर दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.