Ichalkaranji Politics: इचलकरंजीत भाजपची मोठी डिमांड, मित्रपक्षांमध्ये नाराजी; शिवसेना,राष्ट्रवादी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Mahayuti Politics: महायुतीमधून अपेक्षित जागा न मिळाल्यास दोन्ही घटक पक्षापुढील भूमिकेकडे लक्ष असणार आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत देण्यात येत आहेत. त्यामुळे नवीन राजकीय समीकरणे पुढील काळात उदयास येण्याची शक्यता आहे
Mahayuti
Mahayuti Sarkarnama
Published on
Updated on

Ichalkaranji News: इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती होणार असली तरी जागावाटपाचा तिढा मात्र अद्याप सुटलेला नाही. वरिष्ठ स्तरावरून एकत्र निवडणूक घेण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, स्थानिक स्तरावर भाजपकडून घटक पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अगदी नगण्य जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपच्या भूमिकेमुळे घटक पक्षातील नाराजी वाढली असून जागावाटपाचा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, आता महायुतीतील (Mahayuti) घटक पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे .

इचलकरंजी महानगरपालिकेसाठी भाजपकडे इच्छुकांची भाऊ गर्दी आहे त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायचे? याचा प्रश्न आता नेतेमंडळींना पडला आहे. त्यामुळे बंडखोरीची भीती निर्माण झाली आहे. बंडखोरी टाळण्यासाठी आतापासूनच स्वीकृत नगरसेवक पदाचे गाजर दाखविण्यास सुरुवात केली आहे.

सध्या भाजपकडून (BJP) किमान 50 जागा कमळ चिन्हावरून निवडून येतील, असा दावा नतेमंडळींकडून जाहीररित्या केला जात आहे. त्यामुळे एकूण 65 जागांपैकी भाजप किती जागा लढणार? हे अद्याप समोर आलेले नाही.

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या घोषणेकडे आता महायुतीतील घटक पक्षांचे लक्ष लागून राहिले आहेत. शुक्रवारी मंत्री मुश्रीफ इचलकरंजीत जाणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होत आहे. या मेळाव्यात महायुतीतील जागा वाटपाचा तिढा आणि त्यांच्या पक्षाची पुढील भूमिका याबाबत काय बोलणार? याची उत्सुकता असणार आहे

Mahayuti
PM Modi On Bihar: बिहार कसा जिंकला? मोदींनी सांगितला कुणाच्या मनीध्यानी नसलेला 'हा' नवा फॉर्म्युला

महायुतीतील घटक पक्ष संभ्रमावस्थेत महायुतीतील घटक पक्षाच्या जागा वाटपाबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रादी (अजित पवार गट) पक्षाकडून निवडणुकीची तयारी केलेल्या इच्छुकांत चलबिचल सुरू आहे. यातील एका घटक पक्षाला केवळ दोनच जागा देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे. त्यामुळे या पक्षाकडून इच्छुक असलेल्या अन्य उमेदवारांचे काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यातील काही उमेदवारांना भाजपमध्ये घेऊन उमदेवारी देण्याचाही चर्चा रंगत आहे.

Mahayuti
PM Modi: "बिहारमध्ये 'कट्टा सरकार' परत येणार नाही"; PM मोदींचा काँग्रेस-राजदला इशारा

मैत्रीपूर्ण लढतीचे भाजपचे संकेत...

महायुतीमधून अपेक्षित जागा न मिळाल्यास दोन्ही घटक पक्षापुढील भूमिकेकडे लक्ष असणार आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत देण्यात येत आहेत. त्यामुळे नवीन राजकीय समीकरणे पुढील काळात उदयास येण्याची शक्यता आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com