Eknath Shinde Group Sarkarnama
विदर्भ

Eknath Shinde Group : शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याचे वाद्‌ग्रस्त विधान; महिलांना रिव्हॉल्व्हरची परवानगी द्यावी, त्यात 2-4 चांगले लोक मेले तरी चालतील’

Amravati Hindu Virat Morcha : बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट हिंदू मोर्चा काढण्यात आला होता.

Vijaykumar Dudhale

Amravati, 25 August : महिलांना रिव्हॉल्व्हर बाळगण्याची परवानगी द्यावी. रिव्हॉल्व्हर मी घेऊन देईन. तसेच, त्यात दोन चार चांगली लोक मेले तरी चालतील, असे वाद्‌ग्रस्त विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी नानकराम नेभनानी यांनी अमरावतीमधील मेळाव्यात बोलताना केले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये (Amravati) सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट हिंदू मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चोत माजी खासदार नवनीत राणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पदधिकारी सहभागी झाले होते.

विराट हिंदू मोर्चानंतर सभा झाली. त्या सभेत बोलताना शिंदे सेनेचे (Eknath Shinde Group) पदाधिकारी नानकराम नेभनानी यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. त्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

नानकराम नेभनानी म्हणाले, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती केली आहे की, महिलांना रिव्हॉल्व्हर बाळगण्याची परवानगी द्यावी. विशेष करून अमरावतीमध्ये महिलांना रिव्हॉल्व्हर बाळगण्याची परवानगी दिली, तर अमरावतीमधील सर्व महिलांना मी माझ्या स्वतः रिव्हॉल्व्हर खरेदी करून देईन.

स्वसंरक्षणासाठी महिलांनी आता स्वतः जवळ रिव्हॉल्व्हर ठेवावा. त्यामध्ये दोन-चार चांगले लोक मेले तरी चालतील. पण, एकही वाईट माणूस वाचला नाही पाहिजे, असे खळबळजनक विधानही नानकराम नेभनानी यांनी केले आहे.

बांगलादेशमध्ये जे झालं. महिला मुलींवर अत्याचार करण्यात आले. मंदिरं तोडली, त्याच्या निषेधार्थ आज अमरावतीमध्ये मोर्चा काढण्यात आलेला आहे. बांगलादेशमधील व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला अत्यंत दुख आणि वेदना झाल्या. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज अमरावतीमध्ये मोर्चा काढला आहे, असे विराट हिंदू मोर्चात सहभागी झालेल्या माजी खासदार नवनीत राणा यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT