Samadhan Autade's Secret Blast : पोटनिवडणुकीत भारत भालकेंच्या पत्नी उमेदवार असत्या तर मी निवडणूक लढवणार नव्हतो; आमदार आवताडेंचा गौप्यस्फोट

Pandharpur Assembly By Election : राज्य सरकारकडून पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला 2019 मध्ये अर्थसाहाय्य मिळत नव्हते, त्यामुळे (स्व.) आमदार भारत भालके हे निवडणूक लढविण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
Bharath Bhalke-Samadhan Autade
Bharath Bhalke-Samadhan AutadeSarkarnama
Published on
Updated on

Mangalvedha, 25 August : पंढरपूर-मंगळवेढ्याच्या पोटनिवडणुकीत (स्व.) आमदार भारत भालके यांच्या पत्नी उमेदवार असत्या तर आपण निवडणूक लढविणार नव्हतो, असा गौप्यस्फोट पोटनिवडणुकीत विजय झालेले भारतीय जनता पक्षाचे आमदार समाधान आवताडे यांनी केला.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात कासेगाव येथे औद्योगिक वसाहत मंजूर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार समाधान आवताडे (Samadhan Autade) यांनी हा खुलासा केला आहे.

ते म्हणाले की, राज्य सरकारकडून पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला 2019 मध्ये अर्थसाहाय्य मिळत नव्हते, त्यामुळे (स्व.) आमदार भारत भालके (Bharat Bhalke) हे निवडणूक लढविण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यावेळी त्यांनी मी उमेदवारी अर्जावर सही करत असताना मला तयारीत राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्यात त्यांना अर्थसाह्य उपलब्ध झाले, त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली होती.

पंढरपूर-मंगळवेढ्याच्या पोटनिवडणुकीत भारत भालके यांच्या पत्नीची उमेदवारी असती, तर आपण निवडणूक लढवणार नव्हतो. मात्र, पक्षीय स्तरावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे निवडणूक लढवावी लागली. मात्र, कमी काळात जास्तीचा निधी उपलब्ध करण्यात आपण यशस्वी ठरलो, असा दावाही त्यांनी या वेळी बोलताना केला.

Bharath Bhalke-Samadhan Autade
Jayant Patil : पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचा बडा नेता 'तुतारी' हाती घेणार? जयंत पाटलांशी बंद दाराआड चर्चा

दरम्यान, पंढरपूर औद्योगिक वसाहतीचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला. कासेगाव येथील औद्योगिक वसाहतीच्या मंजुरीची अधिसूचना निघाल्यानंतर पंढरपुरातील विरोधकांनीसुद्धा फोन करून माझे अभिनंदन केले, असेही आमदार आवताडे यांनी सांगितले.

आवताडे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर परिसरात औद्योगिक वसाहत व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, त्या प्रयत्नाला यश येत नव्हते. पोटनिवडणुकीत या भागातील मतदारांनी मला संधी दिली. त्यानंतर एमआयडीसीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.

Bharath Bhalke-Samadhan Autade
Samarjeetsinh Ghatge : तुतारी हाती घेणारे समरजितसिंह घाटगे कोण आहेत?

पंढरपूर-मंगळवेढा भागातून पुणे, मुंबई, बदलापूर, चाकण या भागात दररोज सात ते आठ खासगी ट्रॅव्हल्स आणि एसटी महामंडळाच्या बसगाड्या भरून जातात. या मतदारसंघातील तरुणांना रोजगारासाठी गाव सोडावे लागत आहे. मात्र, आता पंढरपूरमध्ये औद्योगिक वसाहत मंजूर झाल्याने भविष्यात या भागात उद्योगधंदे येतील. तरुणांच्या हाताला तालुक्यातच काम मिळेल. एमआयडीसी मंजुरीला यश आल्याने विरोधकांनीही त्यांच्या नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांला यश न आल्याने मी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत आहेत.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com