बुलडाणा : उद्धव ठाकरे यांचं सरकार राज्याच्या सत्तेवर आले, तेव्हापासून राज्यातील घोटाळेबाज मंत्र्यांचे आतापर्यंत 28 घोटाळे मी बाहेर काढले आहेत. येत्या 31 डिसेंबरपर्यंत मी या अलिबाबा चाळीस चोर सरकारमधील 40 चोर बाहेर काढणार आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचा समावेश आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बुलडाण्यात दिली. (Corruption of 40 ministers in Thackeray government to be brought out by December 31 : Kirit Somaiya)
माजी खासदार किरीट सोमय्या हे आज (ता. १२ नोव्हेंबर) बुलडाणा अर्बन बॅंकेच्या मुख्यालयात चौकशीसाठी आले होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर मोठा हल्लाबोल केला. सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना काळात पैसे मोजण्यात व्यस्त होते, त्यामुळे त्यांना मान वर करायला वेळ मिळाला नाही त्यामुळे त्यांना मानेच दुखणं सुरू झाले आहे. ते लवकर बरे होवोत. आम्हाला राज्यातील सर्व पोलिटिकल करप्शन संपवायचं आहे, महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायचं आहे.
माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्यासंबंधी कर्जाच्या प्रकरणाच्या माहिती घेण्यासाठी आज मी आलो आहे. त्याबाबत चौकशीही केली आहे. तसेच, लातूर जिल्हा बँकेच्या संबंधाबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची आम्ही ईडीकडे तक्रार केली आहे, त्याबाबतची चौकशी सुरू आहे. सध्या वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, अशी एका एकांची चौकशी सुरू आहे, पुढे काय काय होतेय ते बघू, असा सूचक इशाराही किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना दिला आहे.
राज्यातील भ्रष्टाचार आम्हाला संपवून टाकायचा आहे. महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायचा आहे. तसेच, किरीट सोमय्याला घाबरवता येत नाही. राज्याच्या मंत्रिमंडळातील अर्धा डझन मंत्री आतापर्यंत जेलमध्ये गेले आहेत. अजून एक डझन मंत्री जेलमध्ये जाणार आहेत. माझ्याविरुद्ध अनेक तक्रारी महाविकास आघाडी करीत आहे, त्याला किरीट सोमय्या घाबरत नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.