विदर्भ

Bacchu Kadu: कोर्टाचा आदेश आधी येतो मग तुम्ही चर्चेला कसे येता? बच्चू कडूंचा सरकारच्या शिष्टमंडळाला खडा सवाल

Bacchu Kadu: कोर्टाच्या आदेशानंतरही शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी नागपूरमधील खापरी इथला महामार्ग अडवून ठेवला आहे. या ठिकाणी त्यांचं ठिय्या आंदोलन सुरु आहे.

Amit Ujagare

Bacchu Kadu: कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रस्तारोको आंदोलन करणाऱे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्यासह रासपचे नेते महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, डाव्या पक्षाचे शेतकरी नेते डॉ. अजित नवले आणि रविकांत तुपकर हे अद्यापही आंदोलनावर ठाम आहेत.

कोर्टानं आंदोलन मागे घेण्याचे आदेश दिलेले असतानाही हे आंदोलन सुरु आहे. सध्या सरकारचं शिष्टमंडळ चर्चेसाठी गेलं आहे. पण कर्जमाफीचं आश्वासनं दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. उलट जेलभरो करु पण मागे हटणार नाही, असा पवित्रा या आंदोलकांनी घेतला आहे. त्यातच आधी कोर्टाचा आदेश येतो मग तुम्ही चर्चेसाठी कसे काय येता? असा सवाल बच्चू कडू यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला विचारला आहे.

राज्यमंत्री आशिष जैयस्वाल आणि पंकज भोयर या सरकारच्या शिष्टमंडळानं बच्चू कडूंसह इतर आंदोलकांशी चर्चा केली. पण शेतकरी कर्जमाफी शिवाय चर्चा नाही अशी भूमिका बच्चू कडूंसह इतर आंदोलक नेत्यांनी घेतली. तुम्ही या क्षणी मुख्यमंत्र्यांना फोन लावा आणि कर्जमाफीबाबत विचारा, असंही त्यांनी शिष्टमंडळाला सांगितलं. तसंच तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारुन आलात की परस्पर आलात? असा सवालही त्यांनी शिष्टमंडळाला केला.

दरम्यान, यानंतर शिष्टमंडळानं मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना फोन लावला आणि बच्चू कडूंसह इतर आंदोलक नेते शेतकरी कर्जमाफीशिवाय ऐकायला तयार नाहीत असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर काही मिनिटे फोनवर चर्चा झाल्यानंतर शिष्टमंडळानं पुन्हा बच्चू कडू यांच्याकडं बावनकुळेंचा फोन देत चर्चा करण्यास सांगितलं. यावेळीही बच्चू कडूंनी त्यांना मुख्यमंत्र्यांना फोन लावून शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी पर्यंत करणार आहेत याची तारीख जाहीर करा. याबाबत शासन निर्णय जाहीर करा, आम्ही माघार घेतो असं बावनकुळेंना सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT