Phaltan Doctor Death Case_CCTV and mobile phone
Phaltan Doctor Death Case_CCTV and mobile phone

Phaltan Doctor Death: अखेर आरोपी बदनेचा मोबाईल पोलिसांच्या हाती! डॉक्टर महिलेचं हॉटेलमधील CCTV आलं समोर

Phaltan Doctor Death: आता सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपीचा मोबाईलमधील डेटा यावरुन प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
Published on

Phaltan Doctor Death: फलटणमधील ज्या हॉटेलमध्ये डॉक्टर महिलेनं स्वतःच जीवन संपवलं त्या महिलेचं हॉटेलमधलं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्याचबरोबर या मृत्यू प्रकरणातील प्रमुख संशयीत आरोपी असलेल्या पीएसआय बदने याचा मोबाईलही आता पोलिसांच्या हाती आला आहे. त्यामुळं आता सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपीचा मोबाईलमधील डेटा यावरुन प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय आहे? तसंच मोबाईलमधील डेटामध्ये नेमकं काय आढळून आलं? जाणून घ्या.

Phaltan Doctor Death Case_CCTV and mobile phone
Phaltan Doctor Death: सुसाईड नोटमधील शब्दाची चुकली वेलांटी! सुषमा अंधारेंच्या खळबळजनक खुलाशानं पोलीस संशयाच्या भोवऱ्यात

मधुदीप या हॉटेलच्या मालकानं हा सीसीटीव्ही फुटेज समोर आणला असून यामध्ये डॉक्टर महिला हॉटेलमध्ये प्रवेश करताना तसंच बुक केलेल्या रुममध्ये जाताना दिसते आहे. याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी हॉटेल मालकावर प्रश्नांची सरबत्ती केली होती. या प्रकरणाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असताना अद्याप हॉटेलनं ही डॉक्टर महिला हॉटेलमध्ये कशी आली, रात्री उशीरा या ठिकाणी येऊनही तिला रुम कशी काय दिली गेली? याबाबतचं सीसीटीव्ही फुटेज अद्याप समोर का आणलेलं नाही? असे अनेक प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केले होते. यानंतर हॉटेल मालकानं पत्रकार परिषद घेत सीसीटीव्ही फुटेज सादर केलं आणि आम्हाला याप्रकरणात उगाचच बदनाम केलं जात असल्याचा आरोपही केला. पण या सीसीटीव्ही फुटेजमधून ही महिला एकटीच स्वतः या हॉटेलमध्ये आली असल्यचं स्पष्ट झालं आहे. याशिवाय कुठलाही महत्वाची घडामोड यामध्ये दिसून येत नाहीए.

Phaltan Doctor Death Case_CCTV and mobile phone
UIDAI चा मोठा खुलासा, 'या' कामांसाठी Valid नाही आधार कार्ड

दरम्यान, याच हॉटेलमध्ये संबंधित डॉक्टर महिलेनं गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं. यावेळी तिच्या हातावर पेनानं सुसाईड नोट लिहिल्याचं देखील आढळून आलं होतं. यामध्ये पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची नाव घेतली होती. यामध्ये आरोपींनी आपला मानसिक आणि शाररिक छळ केल्याचा गंभीर आरोप तिनं केला होता. याप्रकरणी आधी बनकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं नंतर बदने हा दोन दिवसांनी फलटण पोलीस ठाण्यात सरेंडर झाला होता. पण त्यावेळी त्याच्या फोन त्याच्यासोबत नव्हता. पण आता पोलिसांना बदनेचा फोनही हाती लागला आहे. बदनेच्या नातेवाईकांनीच त्याचा फोन पोलिसांनी आणून दिल्याचं सांगितलं जात आहे.

Phaltan Doctor Death Case_CCTV and mobile phone
Jayant Patil : जयंत पाटलांच्या मतदारसंघातूनच महाविकास आघाडीला सुरुंग : एका घोषणेने राजकारण ढवळून निघणार!

पण आता सीसीटीव्ही आणि मोबाईल फोन हे दोन महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्यानं या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार आहे. डॉक्टर महिला आणि बदने यांचा सीडीआर आणि चॅट्समधूनही नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळं या प्रकरणात यापुढे आणखी काय धक्कादायक बाबी समोर येतात हे पाहावं लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com