Shivsena Vs Congress Final Match Sarkarnama
विदर्भ

Cricketnama 2023 : 'क्रिकेटनामा'च्या अंतिम सामन्यात काँग्रेसचे शिलेदार ठरले शिवसेनेवर भारी!

Shivsena Vs Congress Final Match : शेवटच्या चेंडूपर्यंत अंतिम सामना रंगल्याने नागपूरमधील क्रिकेटप्रेमींच्या डोळ्याचे पारणे फिटले.

Pradeep Pendhare

Shiv Sena Riders Vs Congress Warriors : पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी (नागपूर) : 'सकाळ माध्यम समूहा'च्या सरकारनामा आयोजित 'क्रिकेटनामा'चा अंतिम सामना काँग्रेस वॉरियर्स आणि शिवसेना रायडर्स (एकनाथ शिंदे गट) यांच्या रंगला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थित झालेला हा अंतिम सामना अटीतटीचा झाला.

शेवटच्या क्षणापर्यंत कोण-कोणावर कुरघोडी करेल, याची उत्सुकता संपूर्ण मैदानात होती. नाना पटोले यांच्या काँग्रेस वॉरियर्सने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना रायडर्सना हरवत अंतिम सामना खिशात घातला.

काँग्रेस वॉरियर्स आणि शिवसेना रायडर्स (एकनाथ शिंदे गट) सरकारनामा आयोजित क्रिकेटनामा 2023च्या अंतिम सामना पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी मैदानावर रंगतदार झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगल्याने नागपूरमधील क्रिकेटप्रेमींच्या डोळ्याचे पारणे फिटले. काँग्रेस वॉरियर्सचे कप्तान माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी आणि शिवसेना रायडर्सचे कप्तान पुरूषोत्तम जाधव यांच्यात नाणफेक झाली. यात शिवसेना रायडर्सने नाणेफक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस वॉरियर्सचा फलंदाज आमदार वझाहत मिर्झा पहिल्या षटकामध्ये 19 धावांवर बाद धावबाद झाला. यानंतर सलमान सौफी आणि आमदार झिशान सिद्दीकी यांनी फलंदाजाची संभाळली. या जोडीने मैदानात चौफेर फटकेबाजी करत पहिल्या तीन षटकात 51 धावा ठोकल्या. ही जोडी गोलंदाजांवर तुटून पडली होती.

यातच सलमान सौफी धावबाद झाला. यानंतर देखील आमदार झिशान सिद्दीकी यांनी त्यांची फटकेबाजी सुरूच ठेवली. चौथ्या षटकारापर्यंत काँग्रेस वॉरियर्सच्या 68 धावा झाल्या होत्या. शेवटच्या पाचव्या षटकानंतर काँग्रेस वॉरियर्सच्या 81 धावा झाल्या. या दोन फलंदाजाच्या मोबदल्यात काँग्रेस वॉरियर्सने 81 धावांचे आव्हान शिवसेना रायडर्सला दिले.

शिवसेना रायडर्सने 81 धावाचा पाठलाग करण्यासाठी आपले ओपनिंग फलंदाज पोलार्ड बाजवा आणि प्रवेश असुदानी हे मैदानात उतरवले. पहिल्या षटकात या दोघांनी दमदार फलंदाजी करत 26 धावा कुटल्या. दुसऱ्या षटकात शिवसेनेचा रायडर्सचा फलंदाज प्रवेश असुदानी याचा त्रिफळा उडाला. यानंतर दुसरा फलंदाज मन्नू जोहर बाद झाला. यानंतर तिसऱ्या चेंडूवर फलंदाज अमन खालसा बाद झाला. दुसऱ्या षटकात शिवसेना रायडर्सने तीन फलंदाज बाद झाल्याने त्यांच्या खेम्यात शांतता पसरली होती.

यानंतर तिसऱ्या षटकापर्यंत शिवसेना रायडर्सने तीन फलंदाजाच्या मोबदल्यात 39 धावा केल्या होत्या. 13 चेंडूमध्ये 44 धावांची गरज होती. शिवसेना रायडर्स संघावर यामुळे दबाव आला. चार षटकापर्यंत शिवसेना रायडर्सने 63 धावा केल्या. शेवटच्या षटकात शिवसेना रायडर्सला जिंकण्यासाठी 19 धावांची गरज होती.

पोलार्ड बाजवा हे गोलंदाज अमीर यांनी शेवटच्या षटकाचा सामना केला. पहिले दोन चेंडू गुंडाळून ठेवल्याने ते डॉट गेले. परंतु तिसऱ्या चेंडूवर पोलार्ड बाजवा याने चौकार ठोकला. चौथ्या चेंडू डॉट गेला. दोन चेंडूत 15 धावांची गरज होती. पाचवा चेंडूवर पोलार्ड बाजवा याने चौकार ठोकला. काँग्रेस वॉरियर्सने दिलेल्या 81 धावांचे आव्हानाचा पाठलाग करताना शिवसेना रॉयडर्सने पाच षटकात चार खेळाडूंच्या मोबदल्यात 71 धावा केल्या.

आमदार सिद्दीकींचे षटक ठरले 'टर्निंग पॉईंट' -

काँग्रेस वॉरियर्सचे खेळाडू आमदार झिशान सिद्दीकी यांनी शिवसेना रायडर्सविरुद्ध दुसऱ्या षटकात हॅट्रीक घेतली. प्रवेश असुदानी, मन्नू जोहर, अमन खालसा या तीन फलंदाजांना बाद केले. हा षटक सामन्याचा 'टर्निंग पॉईंट' ठरली. यानंतर षटकानंतरच काँग्रेस वॉरियर्सने सामन्यावर पकड घेतली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT