Cricketnama 2023 : राष्ट्रवादीच्या संघाला नमवत काँग्रेसची अंतिम सामन्यात धडक!

Congress Wins against NCP in First Semi Final : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मैदानावर येताच संघाने दिली त्यांना विजयाची भेट
Baba Siddiqui
Baba SiddiquiSarkarnama
Published on
Updated on

NCP (SP) Legends Vs Congress Warriors : पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी (नागपूर) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) संघाला रोखत काँग्रेसच्या टीमने सकाळ माध्यम समूहाच्या ‘सरकारनामा’च्यावतीने आयोजित ‘क्रिकेटनामा’च्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला.

यवतमाळ जिल्ह्याच्या झरी जामणी तालुक्यातील अहेरअलीचे सरपंच हितेश राऊत यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली. यानंतर राष्ट्रवादीने(NCP) गोलंदाजीचा निर्णय घेतला.

मेकोसाबाग परिसरात असलेल्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी, मेथोडीस्ट हायस्कूलच्या प्ले-ग्राऊंड, श्यालोम स्पोर्ट्स ग्राऊंड परिसरात ‘क्रिकेटनामा’चे मंगळवारी (ता. 12) दुसऱ्या दिवसाचे दिमाखदार सामने खेळण्यात आलेत.

राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार स्वागताध्यक्ष व माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके निमंत्रक असलेल्या दुसऱ्या सीझनमधील स्पर्धेचा सहावा सामना काँग्रेस(Congress) आणि राष्ट्रवादीच्या संघात झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Baba Siddiqui
Cricketnama 2023 : सरपंच संघाच्या कडव्या झुंजीनंतर चुरशीच्या सामन्यात शिवसेनेचा विजय!

काँग्रेसचे वझाहत मिर्झा आणि सलमान सुफी सलामीला आले होते. मोहम्मद अन्सारी यांनी राष्ट्रवादी टीकडून पहिलं षटक टाकलं. आक्रमक धावा काढण्याच्या बेतात असताना वझाहत मिर्झा हे धावबाद झाले. त्यानंतर आमदार झिशान सिद्दीकी मैदानावर आले. पहिलं षटक संपल्यानंतर 1 बाद 9 धावा अशी काँग्रेसची स्थिती होती. समीर शेख यांच्या दुसऱ्या षटकात सलमान आणि झिशान यांनी आक्रमक होण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लगेचच झिशान त्रिफळाचित झाले.

झिशान जाताच त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी फलंदाजीची बाजू सांभाळली. आलोक तिवारी यांच्या षटकात बाबा सिद्दीकी ‘हिटविकेट’ झाले. अमित झनक आणि सलमान सुफी यांनी सामना सावरण्याचा प्रयत्न केला. उज्ज्वल नागपुरे यांच्या अखेरच्या षटकात सलमान सुफी ‘कॉट बिहाइंड’ होत बाद झाले.

उमेश डांगे आणि अमित झनक यांनी मैदानावर येत चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला. अशात अमित झनक बाद झाले आणि काँग्रेसचा पहिला डाव 5 गडी बाद 70 धावांवर आटोपला.

Baba Siddiqui
Cricketnama 2023 : अजित पवारांची 'POWER' चालली; 'MNS' संघाला दाखवला बाहेरचा रस्ता!

दुसऱ्या डावाला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रवादीचे समीर शेख आणि राहुल कदम सलामीला उतरले. विनित तोडकर यांनी पहिलं षटक टाकलं. षटकारापासून खेळाला सुरुवात झाली. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर समीर त्रिफळाचित झाले. मोहम्मद इरफान मैदानावर आले. पहिल्या षटकात 1 बाद 10 अशी धावसंख्या एनसीपी टीमची होती.

दुसरं षटक झिशान सिद्दीकी यांनी टाकलं, त्यांना राष्ट्रवादीच्या खेळाडूंनी आक्रमकपणे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. झिशान यांच्या दोन ‘वाइड’मुळे आयत्या दोन धावा राष्ट्रवादीला मिळाल्या. त्यानंतर इरफान झेलबाद झाले.

उज्ज्वल नागपुरे यांनी आल्यानंतर राहुल कदम यांच्या मदतीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सलमान सुफी यांचं तिसरं षटक महागाचं ठरलं. त्यांनी 21 धावा दिल्या. त्यावेळी राष्ट्रवादीला 12 चेंडूत 28 धावा गरजेच्या होत्या.

राष्ट्रवादीचा धावफलक 2 बाद 43 होता. विनित तोडकर यांच्या चौथ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर उज्ज्वल नागपुरे धावबाद झाले. मोहम्मद अन्सारी मैदानावर आले. 8 चेंडूत 26 धावा त्यावेळी विजयासाठी राष्ट्रवादीला हव्या होत्या आणि 3 गडी बाद 45 धावसंख्या होती.

Baba Siddiqui
Cricketnama 2023 : सिद्दीकी पितापुत्र अन् मिर्झांच्या अष्टपैलू खेळीमुळे काँग्रेसकडून शिवसेना पराभूत!

अखेरचं षटक अमीर यांनी टाकलं. त्यांच्यापुढं धावा रोखण्याचं आव्हान होतं. 6 चेंडूत 24 धावा राष्ट्रवादीला गरजेच्या होत्या. अन्सारी यांनी षटकार लगावला. परंतु त्यानंतर लगेचच अन्सारी यांना अमीर यांनी झेलबाद केले. 4 चेंडूत त्यावेळी 18 धावा हव्या होत्या. अलोक तिवारी आल्यानंतर धावण्यात गडबड झाली व ते येताच धावबाद झाले.

अलोक तिवारी बाद होताच काँग्रेसच्या तंबुत विजयोत्सव सुरू झाला. 3 चेंडूत 17 धावांची गरज असताना रमेश तवळे आणि राहुल कदम खेळत होते. 1 चेंडूत 16 धावा काढणं अशक्यच होतं. त्यामुळं काँग्रेसनं सामना जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole), आमदार धीरज लिंगाडे यांच्या हस्ते सलमान जुल्फी यांना सामनावीराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नीलेश नातू आणि आकाश मांजरेकर यांनी सामन्याचं सूत्रसंचालन व समालोचन केलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com