Shiv Sena Riders Vs NCP (AP) Lions : पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी (नागपूर) : अत्यंत चुरशीच्या सामन्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रायडर्स आता काँग्रेस वॉरीयर्ससोबत अंतिम सामन्यात लढत देणार आहेत. शिवसेना शिंदे गटाने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
मेकोसाबाग परिसरात असलेल्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी, मेथोडीस्ट हायस्कूलच्या प्ले-ग्राऊंड, श्यालोम स्पोर्ट्स ग्राऊंड परिसरात ‘क्रिकेटनामा’चे मंगळवारी (ता. 12) दुसऱ्या दिवसाचे दिमाखदार सामने खेळण्यात आलेत. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार स्वागताध्यक्ष व माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके निमंत्रक असलेल्या दुसऱ्या सीझनमधील स्पर्धेचा सातवा सामना सरपंच टायटन्स आणि शिवसेना रायडर्स यांच्यात झाला.
सामन्याला सुरुवात होत नाही तोच सलामीवीर सारंग हे बाद झालेत. त्यानंतर लगेच विशाल खांडेकर धावबाद झोलत. पोलार्ड बाजवा यांनी या दोन्ही विकेट घेतली. त्यानंतर अनिकेत आणि अमोल कांबळे यांनी चांगली खेळी खेळण्याचा प्रयत्न केला. दोन षटकं होईपर्यंत 2 बाद 12 धावा अशी राष्ट्रवादी टीमची स्थिती होती. पोलार्डच्या त्यानंतरच्या षटकात मात्र एनसीपीच्या फलंदाजांनी फटके हाणले. तीन षटकं संपल्यांनतर धावफलक 2 बाद 31 वर होता. अमोल कांबळे आणि अनिकेत हे फलंदाजी करीत होते.
प्रवेश आसुदानी यांच्या चवथ्या षटकातही ही फटकेबाजी कायम होती. त्यामुळं शिवसेनेचे गोलंदाज मैदानावर सातत्यानं व्यूहरचना बदलत होते. सतत चर्चा करीत होते. तुषार दलाल यांनी अखेरचं षटक टाकलं. त्यावेळी दोन्ही संघांवरचा दबाव स्पष्ट दिसत होता. अंतिम सामन्यात जाण्यासाठीच्या या संघर्षात पहिला डाव 3 बाद 54 धावांवर आटोपला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेना शिंदे गटाने फलंदाजीसाठी पोलार्ड बाजवा, प्रवेश आसुदानी यांना पाठवलं. सारंग यांनी गोलंदाजीला सुरुवात केली. पोलार्डचं चौकारानं खेळाला सुरुवात केली. पहिल्या षटकात कोणताही गडी न गमावता शिवसेना 12 धावांवर होती. विशाल खांडेकर यांनी दुसरं षटक टाकलं. त्यावरही प्रवेश आणि पोलार्ड यांनी चांगल्या धावा घेतल्या. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीवेळी 24 धावांवर शिंदे गट होता. 18 चेंडूत 31 धावांची गरज संघाला विजयासाठी होती. सारंग यांच्या तिसऱ्या षटकातही पोलार्ड ‘फार्मात’ दिसले. काही जोखीमपूर्ण धावाही या जोडीनं घेतल्या. 13 चेंडूत 12 धावा त्यावेळी झाल्या. 12 चेंडूत 6 धावा शिल्लक असताना शिंदे गटाच्या पॅव्हेलियनमध्ये आनंदोत्सव सुरू झाला.
अनिकेत यानं चवथ षटक सुरू केलं त्यावेळी यष्टीरक्षकानं पोलार्डला बाद केलं. त्यावेही 1 बाद 49 अशी धावसंख्या होती. 11 चेंडूत 6 धावा शिंदे गटाला हव्या होत्या. पोलार्डनंतर मैदानावर कर्णधार पुरुषोत्तम जाधव आलेत. ‘नो बॉल’वर त्यांनी पाच धावा मिळविल्या. त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे गट 6 गडी राखत विजयी झाला. सामनाविराचा पुरस्कार पोलार्ड बाजवा यांना ‘सरकारनामा’चे संपादक ज्ञानेश सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नीलेश नातू आणि आकाश मांजरेकर यांनी सामन्याचं सूत्रसंचालन व समालोचन केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.