Cricketnama News Sarkarnama
विदर्भ

Cricketnama 2023 : नागपूर अधिवेशनात 'क्रिकेटनामा'चा ज्वर...

'Cricketnama' fever in Nagpur Session: राजकीय संघप्रमुखांच्या रणनीती गुलदस्त्यात!

Pradeep Pendhare

Nagpur News : पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी (नागपूर)  ःनागपूर हिवाळी अधिवेशनामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच 'सकाळ माध्यम समूहा'च्या 'सरकारनामा'कडून उद्या सोमवारी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरीत होत असलेल्या 'क्रिकेटनामा'मुळे आणखीच राजकीय धुरळा उडू लागला आहे. राजकीय पक्षाचे संघ आणि त्यांचे संघ प्रमुख पडद्या आडून रणनीती आखू लागले आहे. समोरच्या संघाचा अंदाज घेत विजयासाठी मैदानात सर्व काही, अशीच तयारी प्रत्येक राजकीय संघाने सुरू केली आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक पहिल्या दिवसांपासून आक्रमक आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी पिक उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे. दुधाला भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. यातच कांद्यावर निर्यात बंदी घातली आहे. गारपीटमुळे कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. यातच आमदार नवाब मलिक यांच्याविरुद्ध देशद्रोह गुन्हा दाखल असून ते सत्ताधारी अजित पवार गटांच्या बाकावर बसले. यात अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे इक्बाल मिर्चीचे प्रकरण समोर आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा, ओबीसी आणि धनगर समाजाचा आरक्षणावरून संघर्ष सुरू आहे. धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या दिशेने चप्पल फेकल्याचा प्रकाराने राज्यात अधिकच खळबळ उडाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांची राजकीय जिरवा-जिरवी करत असतानाच यातच 'सकाळ माध्यम समूहा'च्या 'सरकारनामा'ने आयोजित केलेल्या 'क्रिकेटनामा'निमित्ताने हे सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख पुन्हा एकदा नागपूरच्या श्यालेम स्पोर्ट्स ग्राऊंडवर पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरीत आमने-सामने येणार आहेत.

विधिमंडळाच्या सभागृहात एकमेकांची जिरवा-जिरवी करत असतानाच ही राजकीय प्रमुख मंडळी आपल्या संघाद्वारे आता 'क्रिकेटनामा'च्या मैदानात एकमेकांची 'विकेट' घेण्याच्या तयारी आहेत. 'सरकारनामा' आयोजित 'क्रिकेटनामा' नागपूरच्या श्यालेम स्पोर्ट्स ग्राऊंडवर पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरीत उद्या सोमवारी दुपारी चार वाजल्यापासून क्रिकेट सामने रंगणार आहेत.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, काॅंग्रेसचे नाना पटोले, मनसेचे राज ठाकरे आणि प्रहारचे बच्चू कडू यांचे संघ मैदानात असणार आहेत. हे संघ जिंकण्याच्या तयारीने मैदानात उतरत आहे. यासाठी संघ प्रमुख आपल्या संघातील खेळाडूंना बरोबर घेऊन रणनीती आखत आहे.

अधिवेशनात एकमेकांना प्रश्न आणि उत्तराच्या माध्यमातून धारेवर धरणारे हे राजकीय खेळाडू 'सकारनामा'च्या पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरीच्या मैदानात क्रिकेटच्या माध्यमातून एकमेकांना आजमावणार आहेत. एकमेकांची चाचपणी करणार आहे. चौकार, षटकार ठोकत मैदान गाजवणार आहे. विरोधक म्हणून विकेट घेण्याची देखील घाई मैदानात दिसणार आहे.

नागपूरकरांमध्ये 'क्रिकेटनामा'ची चर्चा रंगली

नागपूरकरांना 'सकारनामा'च्या माध्यमातून आयोजित केलेल्या राजकीय 'क्रिकेटनामा' पाहण्याची संधी असणार आहे. नागपूरकरांनी देखील या राजकीय 'क्रिकेटनामा'ची उत्सुकता वाढलेली दिसते आहे. तशी चर्चा नागपूरकरांमध्ये रंगू लागल्या आहेत. सार्वजनिक चौकात असलेल्या रिक्षा चालकांमध्ये या राजकीय 'क्रिकेटनामा'ची चर्चा असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच संघ भारी ठरणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम ग्राऊंडवर हा 'क्रिकेटनामा' रंगणार असल्याने तेच पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरीच्या मैदानात वरचढ ठरतील, अशा चर्चा सुरू आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT