Neelam Gorhe
Neelam Gorhe sarkarnama

Talwade Factory Accident : नऊ जणांचा बळी घेणाऱ्या तळवडे कारखाना दुर्घटनेचा मुद्दा विधिमंडळात पोहचणार!

Neelam Gorhe News : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घटनास्थळाला दिली भेट
Published on

Chinchwad News : चिंचवडमध्ये तळवडे येथील शिवराज एंटरप्रायजेस या स्पार्कल मेणबत्ती बनविण्याच्या बेकायदेशीर कारखान्यात शुक्रवारी (ता.8) दुपारी स्फोट होऊन सात महिला कामगारांचा बळी गेला, तर नऊ महिलांसह दहाजण जखमी झाले होते.

आता जखमींमधील तीन महिलांचे निधन झाल्याने बळींचा आकडा आता नऊ झाला आहे. तर या दुर्घटनेत 15-16कामगार सुदैवाने बचावल्याची माहिती रविवारी (ता.10) हाती आली आहे. परंतु, घाबरल्याने या महिला पुढे आलेल्या नाहीत.

दरम्यान, या अनधिकृत कारखान्यातील स्फोट आणि मृत्युंचा मुद्दा सोमवारी विधिमंडळात आमदारांकडून उपस्थित केला जाणार आहे. त्यावेळी अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून महापालिकांनी काय उपाय करायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वत: ही माहिती रविवारी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर दिली.

बर्न वॉर्ड उद्योगनगरीत नसल्याने तळवडे अग्निकांडांतील जखमींना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची शनिवारी (ता.9) डॉ. गोऱ्हे यांनी विचारपूस केली होती. तर, विधान परिषद सदस्य उमा खापरे यांच्यासह त्यांनी घटनास्थळाची रविवारी पाहणी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Neelam Gorhe
Talawade Fire Accident : तळवडे जळीतकांडात मोठी अपडेट; चार कारखाना मालकांवर गुन्हा, पण...

धोकादायक आणि घातक पदार्थांमुळे अपघात होणाऱ्या पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योगांची माहिती गोळा करा आणि तेथे सीसीटीव्ही यंत्रणा बसवा, असे आदेश गोऱ्हे यांनी औद्योगिक सुरक्षा संचालनालयाला या पाहणीनंतर दिले.

माजी उपमहापौर केशव घोळवे,अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, उप आयुक्त मनोज लोणकर, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, उपअग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे, तहसीलदार अर्चना निकम, पोलीस उपआयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त पद्माकर घनवट,औद्योगिक सुरक्षा संचलनालयचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, तळवडे दुर्घटनेतील शिल्पा राठोड (वय 31 वर्षे) या जखमींचे ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना रविवारी निधन आहे. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या आता 9 झाली आहे. तळवडे येथील आगीत 6 जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. तर, 10 जण जखमी झाले होते.

Neelam Gorhe
Pimpri Chinchwad Fire : 7 निष्पाप महिला कामगारांचे बळी घेणारा कारखाना होता अनधिकृत

जखमींतील प्रतिक्षा तोरणे (वय 16 वर्षे) परवा आणि कविता राठोड (वय 35वर्षे) यांचे काल निधन झाले. बाकीच्या 8 रुग्णांवर ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यातील राठोड यांचा रविवारी मृत्यू झाला. उर्वरित सात जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक मदतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ससून रुग्णालयामध्ये मदत कक्ष सुरु करण्यात आला असून त्यात एक डॉक्टर आणि दोन मदतनीस 24x7 उपलब्ध आहेत.

(Edited by- Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com