Devendra Fadnavis 1 Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : कडव्या डाव्यांच्या समर्थनासाठी विधेयक न वाचताच टीका; CM फडणवीसांनी ठाकरेंना फटकारलं

CM Devendra Fadnavis Criticizes Uddhav Thackeray in Nagpur Over Public Safety Bill : नागपूरच्या धंतोली परिसरात प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

Pradeep Pendhare

Jan Suraksha Bill criticism : ‘‘काही लोक जनसुरक्षा कायद्यातील एकही अक्षर न वाचता, त्याच्या विरोधात बोलत आहेत. त्यांनी जर विधेयक वाचले, तर ते कधीच या विधेयकाच्या विरोधात बोलणार नाहीत.

या विधेयकाच्या विरोधात बोलत आहेत ते कडव्या डाव्यांचे एका प्रकारे समर्थन करत आहेत. या कायद्यामुळे कोणाचाही आंदोलनाचा अधिकार काढून घेतलेला नाही,’’ असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली.

नागपूरच्या (Nagpur) धंतोली परिसरात प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘या कायद्यामुळे कोणालाही सरकार विरोधात बोलण्या- लिहिण्यापासून थांबवले नाही. सरकार विरोधात अभिव्यक्ती करण्याचा अधिकार काढून घेतलेला नाही. सर्वांना आंदोलन करता येईल. हा एकमेव कायदा आहे, ज्याच्यामध्ये संघटनांवर बंदी घातल्यानंतर त्यात व्यक्तीवर कारवाई करता येईल. या कायद्यानुसार व्यक्तीला अटक करायचे असेल, तर या कायद्यात स्थापन केलेल्या मंडळाकडून परवानगी घ्यावी लागेल. त्यांना 30 दिवसात न्यायालयात जाता येईल.’’

'जनसुरक्षे'वर 12हजार सूचना

‘‘जनसुरक्षा कायदा दोन्ही सभागृहांनी मंजूर केला ही आनंदाची बाब आहे. या संदर्भात आम्ही लोकशाही पद्धत राबवली. सर्वपक्षीय 25 नेत्यांची समिती बनवून त्यात कायद्यावर चर्चा केली. त्यांच्या सूचना लक्षात घेतल्या. समितीने एकमताने त्यांचा अहवाल दिला. जनतेकडूनही 12हजार सूचना आल्या त्यानुसार आपण मसुद्यात बदल केले. त्यामुळे भारताच्या राज्यघटनेला उलथून टाकण्याचा विचार करणाऱ्या माओवादी शक्तीविरोधात आपल्याला कारवाई करता येईल", असे मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठणकावून सांगितलं.

निकम यांच्याकडून फडणवीसांच्या अपेक्षा

‘‘ख्यातनाम विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपतींनी राज्यसभेत नियुक्ती केली आहे. त्याबद्दल राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचे आभार मानतो. पंतप्रधान राष्ट्रभक्तांच्या मागे उभे राहतात हे याच्यातून दिसून आले आहे. भविष्यातही ते देशाच्या संसदेपासून न्यायालयापर्यंत राष्ट्रभक्तीच्या भावनेने अशाच प्रकारे देशाच्या शत्रूशी लढत राहतील अशी अपेक्षा आहे,’’ असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

नक्षलवाद्यांवर कारवाई करणार

‘‘लोकशाही असलेल्या संघटनांमध्ये घुसा आणि तिथे अराजकता निर्माण करा असा संदेश नक्षलवाद्यांच्या म्होरक्यांनी त्यांच्या केडरला दिला आहे. आता नक्षलवादी कोणत्या कोणत्या संस्थांमध्ये शिरले आहेत. त्याची माहिती घेतली जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल,’’ असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT