
Samata Parishad Ahilaynagar meeting : राज्यात मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू आहे. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी धडपड दिसते आहे. यातून हा संघर्ष अधिकच वाढला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम देत मुंबईत येत असल्याचं आव्हान दिलं आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसींना संघटन करण्याच्या हालचाली मंत्री छगन भुजबळांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून सुरू केल्या आहेत. समता परिषदेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ महाराष्ट्र दौऱ्यावर असून, कार्यकर्ते अन् पदाधिकार्यांना जातगणनेवर बारकाईनं लक्ष ठेवण्याचं फर्मान सोडलं आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) अहिल्यानगर दौऱ्यावर असताना परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेत मार्गदर्शन केले. 'समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी जातगणनेकडे लक्ष ठेवावे. डोळ्यात तेल घालून पाहावे. एससी, एसटीची गणना होते, त्यांच्या संख्येनुसार नीती आयोग त्यांना निधी देतो. अशाच पद्धतीने ओबीसींच्या विकासाठीही निधी जातगणनेमुळे मिळणार आहे', याकडे समीर भुजबळ यांनी लक्ष वेधले.
'जातगणनेमध्ये प्रत्येकाने आपली जात सरकारी रजिस्टरमध्ये नोंदवली पाहिजे. कोणी चुकीची माहिती दिली, खोटी जात, खोटे वय, खोटा पत्ता दिला, तर त्याची चौकशी होऊन संबंधितांविरोधात गुन्हा (Crime) दाखल होऊ शकतो. त्यामुळे समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी खोटी माहिती देणाऱ्यांविरोधात डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा', असे समीर भुजबळ यांनी सांगितले.
समीर भजुबळ यांनी मराठा समाजाचा सरसकट ओबीसींमध्ये समावेश करण्यास समता परिषदेचा विरोध आहे. आमच्या न्याय हक्कांवर गदा येऊ नये, यासाठी समता परिषद काम करत आहेत. मराठ्यांना सरकारने आरक्षण दिले. तसेच 'ईडब्ल्यूएस'च्या 10 टक्के आरक्षणात 8.5 टक्के आरक्षणाचा लाभ मराठ्यांना मिळाला आहे. त्यामुळे मराठ्यांना सरसकट ओबीसींमध्ये समावेश करण्याची गरज नाही, असे समीर भुजबळांनी ठासून सांगितले.
ओबीसींमध्ये साडेचारशेंच्यावर जाती आहेत. त्यांच्यासाठी 27 टक्के आरक्षण आहे. त्यातील केवळ 19 टक्के खऱ्या ओबीसांना लाभ मिळतो, 54 लाख मराठा ओबीसी झाल्यावर आम्ही हरकती घेतल्या आहेत. त्याची तपासणी आणि चौकशी सुरू असल्याकडे समीर भुजबळांनी या मेळाव्यातून लक्ष वेधले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.