Nandalal Gurve, Bhandara Congress 

 

Sarkarnama 

विदर्भ

नानांच्या भंडारा जिल्ह्यात प्रचाराचे पैसे मिळेनात म्हणून काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

जिल्हा परिषद निवडणुकांसाठी प्रचार केल्याचा या पदाधिकाऱ्यांचा दावा

सरकारनामा ब्युरो

भंडारा : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील कॉंग्रेस (Congress) पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. 21 डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी वापलेल्या गाड्या, बॅनर आणि इतर गोष्टीसांठी भाडे तत्त्वावर घेतलेल्या साहित्याचे पैसे न दिल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी हे राजीनामे दिल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यात नुकत्याच 21 डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या. यात 39 जिल्हा परिषद क्षेत्र 79 पंचायत समिति व 39 नगरपंचायत साठी निवडणुका पार पडल्या. कॉंग्रेसच्या उमेदवारांना निवडणुकीत विजयी करण्यासाठी तगडा प्रचार करण्यात आला. प्रचारासाठी उमरवाड़ा सरपंच काॅंग्रेस पदाधिकारी नंदलाल गुर्वे यांनी येरली जिल्हा परिषद प्रमुख म्हणूत तर संजय बोरकर यांनी उमरवाड़ा बूथ कमिटी प्रमुख काम पाहिले होते.

निवडणुकीच्या प्रचारासाठी गुर्वे आणि बोरकर यांनी भाडेतत्त्वावर गाड्या बोलवल्या, बॅनर लावले. परंतु आता त्याचे थकित पैसै अनेकदा मागणी करुनही पक्ष संघटनेकडून मिळाले नसल्याने दोघांवरही संबंधितांकडून पैशांसाठी दबाव टाकला जात आहे. या दबावाला त्रासलेल्या नंदलाल गुर्वे आणि संजय बोरकर यांनी आपल्या पदाचे राजीनामा देत असल्याची खंत व्यक्त केली.

या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे मदन शिवराम भगत व येरली पंचायत समितीसाठी स्वत: तालुकाध्यक्ष शंकर लौंदे राऊत व मिटेवानी पंचायत समितीसाठी महिला पदाधिकाऱ्याला तिकीट देण्यात आली होती. नंदलाल गुर्वे यांनी निवडणुक प्रचारासाठी स्वत:जवळील 35 हजार रुपये निवडणुकीच्या कामी खर्च केले.पण पक्ष संघटनेकडून त्यांना 10 पैसे सुद्धा मिळाले नसल्याच्या आरोप त्यांनी केला आहे.

त्यामुळे इतर निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी आलेला खर्च, प्रचारासाठी गाड़ी खर्च हा थकित राहिल्याने हे सर्व बॅनरवाले गाडीवाले पैशासाठी तगादा लावत असल्याच्या आरोप त्यांनी पत्राद्वारे केला आहे. या मानसिक त्रासाला कंटाळून पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या बाबत सरकारनामा'ने उमरवाड़ा सरपंच कांग्रेस पदाधिकारी नंदलाल गुर्वे ह्याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बॅनरसाठी 40 हजार, 2 गाड्यासांठी 20 हजार व इतर गोष्टींसाठी 7-8 हज़ार रूपये खर्च केल्याचे सांगितले. सर्व ख़र्च उमेदवारांकडून होणे अपेक्षित होता. मात्र आता या थकीत खर्चाबद्दल उमेदवार बोलायला तयार नसल्याचे गुर्वे यांनी सांगितले आहे. त्यामुळे माझ्या सांगण्यावरुन आलेले गाड़ीवाले, बॅनरवाले आता माझ्याकडेच पैशाची मागणी करत आहे. पण माझ्याकडे पैसे नाहीत तर मी देणार कुठून, असा सवालही त्यांनी केला आहे. त्यामुळे या लोकांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT