भाजपनं राज्यपालांचे कान भरले ; विधानसभा अध्यक्ष निवडणुक कधी?

राज्यपाल दोन दिवसानंतरही 'रिप्लाय करीत नाही. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कान भरल्याने राज्यपाल पत्रावर सही करीत नाहीत, असा आरोप नाना पटोले (Nana Patole) यांनी सोमवारी केला.
Bhagat Singh Koshyari

Bhagat Singh Koshyari

sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : विधीमंडळाच्या अधिवेशनाला (Assembly Winter Session 2021) सोमवारी पुन्हा सुरवात झाली; मात्र, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर कार्यवाही होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या निवडणुकीबाबत राज्यपाल दोन दिवसानंतरही 'रिप्लाय करीत नसल्याकडे लक्ष वेधत, विरोधीपक्ष भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कान भरल्याने राज्यपाल पत्रावर सही करीत नाहीत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सोमवारी केला. निवडणूक अडविली; तरीही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढची दिशा ठरविण्यात येणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले.

अधिवेशनाच्या शेवटच्या दोन दिवसांत विधानसभा अध्यक्ष निवडण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. त्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी होण्याची शक्यता होता. त्यामुळे या निवडणुकीसह उमेदवाराच्या नावाकडे लक्ष लागले असतानाच या निवडणुकीबाबत राज्यपालांना पाठविलेल्या पत्रावर सोमवारीपर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत सही झालेली नाही. यासंदर्भात निर्णय व्हावा म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी रविवारी राज्यपालांची भेट घेतली. तेव्हा, कायदेशीर बाबींचा अभ्यास करुन निर्णय घेऊ, असे सांगून राज्यपालांनी नेत्यांना निरोप दिला होता.

<div class="paragraphs"><p>Bhagat Singh Koshyari</p></div>
निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्याचा ठाकरे सरकारचा निर्धार

पटोले म्हणाले, "विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी केलेली नाही. मात्र, आपल्या सोयीच्या कार्यक्रमांना वेळ देणारे राज्यपाल मात्र महत्त्वाच्या पदाच्या निवडणुकीकडे राजकारणातून दुर्लक्ष करीत आहेत. ही निवडणूक होऊ नये, याकरिता भाजपने प्रयत्न केले होते. भाजप नेत्यांच्या घुसखोरीमुळे राज्यपाल निर्णय घेत नाहीत. त्यावर सोमवारी दुपारी पुन्हा बैठक घेऊन दिशा ठरविली जाईल."

राज्यपालांमुळे ही निवडणूक थांबल्याचे सांगणाऱ्या काँग्रेसमधील उमेदवाराचा गोंधळ अजूनही संपलेला नाही. हायकमांड उमेदवार ठरविणार असल्याचे जाहीर करण्यात आले. निवडणुकीचा दिवस आला तरीही अध्यक्षपदाचा काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव सांगता येत नाही.

तर दुसरीकडे ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्दयावरून ठाकरे सरकारमधील मित्रपक्षांनी एकजूट दाखवून निवडणूक पुढे ढलकण्याचा निर्धार केला असून, त्यासाठी सोमवारी सकाळीच बैठक बोलविण्यात आली. राज्याचे मदत व पुर्नविकास मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, "ओबीसींच्या मुद्दयावर आम्ही पहिला लढा उभारला. तेव्हा फारसे गांभीर्याने घेतले नव्हते; आता मात्र केंद्र सरकारला जाग आली आहे. ओबीसींच्या आरक्षणावरून महाराष्ट्रातच नव्हे अन्य राज्यांतही गोंधळ आहे. या निवडणुका पुढे पुढच्या सहा महिन्यांत आरक्षणा मिळण्यासाठीची तयारी केली जाणार आहे,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com