संदीप रायपूरे
Chandrapur : राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमूख नेते आहेत. एकमेकांप्रती त्यांची मवाळ भूमिका राहिली आहे. पण आता एका मुद्द्यावरून दोघेही आमनेसामने आले आहेत. शासकीय नोकरी यापुढे कंत्राटी पद्धतीने भरल्या जातील, असा आदेश सरकारने काढला. या मुद्द्यावर तरुणांचं उज्वल भविष्य चकनाचूर करणारे हे नालायक सरकार असल्याची घणाघाती टीका विजय वडेट्टीवार यांनी केली होती.
यावर सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी त्यांना सत्तेची घाई झाली आहे. आधी त्यांनी अभ्यास करावा, नंतरच भाष्य करावे, असा टोला मारत सरकारवर टीका करणाऱ्या वडेट्टीवारांना प्रत्युत्तर दिले. वडेट्टीवारांची भूमिका बुद्धिहीनतेचे प्रतीक असल्याचेही मुनगंटीवारांनी म्हटलं आहे.
राज्यात यापुढे शासकीय नोकरीऐवजी कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. याकरिता नऊ खासगी कंपन्यांची नेमणूक करण्यात आली. याबाबतचा शासन निर्णयदेखील घेण्यात आला. शासनाच्या या निर्णयाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. यापुढे आपलं भविष्य अंधकारमय होईल, अशी भीती तरुणाईला आहे. यामुळे राज्यभरातून या निर्णयाचा तीव्र विरोध केल्या जात आहे. हाच मुद्दा पकडून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. तरूणाईच्या उज्वल भविष्याचं स्वप्न चकनाचूर करणारा हा निर्णय असल्याचे ते म्हणाले.
नऊ खासगी कंपन्यांना कंत्राट पद्धतीन नोकरभरती करण्याच्या सरकारने निर्णय घेतला. तसा अध्यादेश काढला आहे. यामुळे ओबीसींचं आरक्षण संपवणार, तरुण देशोधडीला लागणार असा आरोप करत वडेट्टीवार यांनी या अध्यादेशाची होळी करा. रस्त्यावर उतरा, आंदोलन करा, जोपर्यंत जीआर परत घेत नाही, तोपर्यंत मागे हटू नका असे आवाहन तरुणांना करताना हे सरकार नालायक असल्याचा घणाघात विजय वडेट्टीवारांनी केला होता.
शिंदे - फडणवीस -पवार सरकार(Shinde Fadnavis - Pawar Government) वर टीकेची तोफ उडविणाऱ्या वडेट्टीवार यांच्या भाष्यावर मुनगंटीवारांनी त्यांची भूमिका ही बुध्दीहीनतेचे प्रतीक दर्शविणारी आहे. हा अध्यादेश या सरकारने काढलेला नाही. हा अध्यादेश मागचा सरकारने काढला होता. मागच्या सरकारने काढलेल्या जीआरमध्ये दोष होता. नोकरभरती करण्याचं कंत्राट दोन कंपन्यांकडे होतं. त्या दोन कंपन्यांची मक्तेदारी होती. ती तोडून काढत नऊ कंपन्यांकडे काम दिलं, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
सरकारने काढलेल्या या जीआरच्या विरोधात राज्यातील तरुणांमध्ये संतापाची लाट दिसून आली. काही जिल्ह्यात तरुणांनी आंदोलन केलं. जीआर रद्द करण्याची मागणी लावून धरली.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.