Pusesavali News : पुसेसावळी गावात सर्व व्यवहार सुरू असून, प्रशासनाने गावात सलोखा प्रस्थापित केला आहे. या घटनेतील दोषींवर कडक कारवाई होईल. तसेच कुणाही निर्दोष व्यक्तींवर कारवाई होणार नाही. तसेच निर्दोष व्यक्तींना त्रास होणार नाही, याची खबरदारी प्रशासन घेईल, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.
पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी आज पुसेसावळीला Pusesavali भेट दिली. तसेच येथे शांतता समितीची बैठक घेतली. त्यानंतर मंत्री देसाई बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्यासह सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री देसाई यांनी पुसेसावळी येथील घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच प्रार्थनास्थळाची ही पाहणी केली. तसेच काही महत्त्वपूर्ण सूचना अधिकारी यांना केल्या.
पुसेसावळी येथील घटना दुर्दैवी आहे. ग्रामस्थांनी शांतता राखावी असे आवाहन करून पालकमंत्री देसाई म्हणाले, प्रशासनाने गावात सलोखा प्रस्थापित केला आहे. या घटनेतील दोषींवर कारवाई होईल. तसेच कोणाही निर्दोष व्यक्तींवर कारवाई होणार नाही. निर्दोष व्यक्तींना नाहक त्रास होणार नाही, याची प्रशासन खबरदारी घेईल.
Edited By Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.