Mumbai: धारावीचा विकास करण्याचे कंत्राट अदानी ग्रुपकडे देण्याच्या निर्णयाला ठाकरे गटाने विरोध केला आहे. ठाकरे गटाने त्याविरोधात शनिवारी मोर्चा काढला. मोर्चावर राज ठाकरे यांनी आज भाष्य केलं. यांना आता जाग का आली? सेटलमेंटसाठी मोर्चा काढला काय?, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे. त्याला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.
आमच्या मोर्चात धारावी आणि मुंबईच्या समस्यांचे मुद्दे होते. आमच्या मोर्चात BJP नव्हती मग सेटलमेंट कशी होणार? असा टोला उद्धव ठाकरेंनी राज यांना लगावला. त्याचवेळी गौतमी अदानींचे चमचे कोण आहेत हे आता कळलं, असेही ते म्हणाले.
सेटलमेंट करण्यासाठी ठाकरे गटाने गौतम अदानी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला आहे. महाविकास आघाडीला आता जाग आली आहे का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. अदानी समूहाकडून पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.
"पारदर्शक, खुल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील बोली लावल्यानंतर धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे काम अदानी समूहाला मिळाले. या निविदेतील अटी या महाविकास आघाडी सरकारच्या काळात निश्चत झाल्या होत्या, असे अदानी समूहाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.