Kailas Gorantyal: सलीम कुत्ताची 1998 मध्येच हत्या; गोरंट्याल यांचा खळबळजनक दावा, राणे म्हणतात तो 'कुत्ता' कोण?

Nagpur Winter session:रोहित वर्मा, बाळू ठाकरे, संतोष शेट्टी यांनी सलीम कुत्ताची हत्या केली
Kailas Gorantyal
Kailas GorantyalSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी दाऊदचा हस्तक सलीम कुत्ताच्या पार्टीत सहभागी झाल्याचा आरोप केला होता. त्या संदर्भातील एक फोटोच सभागृहात दाखवून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यावर गृहमंत्री फडणवीस यांनी चौकशी करण्यासाठी एसआयटीची घोषणा केली होती. मात्र, आता काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी नितेश राणे यांच्या आरोपातील हवाच काढून घेतली आहे.

नितेश राणे यांनी ज्या सलीम कुत्ताचा उल्लेख केला आहे, त्या कुत्ताची 1998 मध्ये हत्या झाली असल्याचा दावा गोरंट्याल यांनी केला आहे. ते सोमवारी विधान भवन परिसरात बोलत होते. आमदार नितेश राणे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये दाऊद इब्राहिमचा जवळचा हस्तक आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्या पार्टीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर सहभागी झाले होते, असा आरोप केला आहे.

Kailas Gorantyal
Raj Thackeray : सेटलमेंटसाठीच उद्धव ठाकरेंचा अदानींविरोधात मोर्चा; राज ठाकरेंनी काढले उट्टे

या आरोपाची दखल घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याची सभागृहात घोषणा केली. दरम्यान, ठाकरे गटाकडूनही भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचाही सलीम कुत्ताच्या पार्टीमध्ये सहभाग असल्याचा फोटो व्हायरल करण्यात आला. त्यावर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी महाजन यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

गृहमंत्र्यांनी माहिती द्यावी ...

सलीम कुत्तावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवरून आणि चौकशी करण्याची मागणी, या सगळ्या गदारोळात आमदार कैलास गोरंट्याल यांनी एक खळबळजनक माहिती पुढे आणली आहे. गोरंट्याल म्हणाले की, नितेश राणे यांनी ज्या सलीम कुत्ताच्या पार्टीचा उल्लेख केला आहे. त्या सलीम कुत्ताची 1998 मध्येच रुग्णालयात हत्या झाली आहे. छोटा राजनच्या गँगमधील रोहित वर्मा, बाळू ठाकरे, संतोष शेट्टी यांनी सलिम कुत्ताची हत्या केली असल्याचा खळबळजनक दावा गोरंट्याल यांनी केला आहे. तसेच सलीम कुत्ताला तीन पत्नी असून, त्यांनीदेखील टाडा न्यायालयात सलीम कुत्ताची हत्या झाली असून, त्याची जप्त केलेली मालमत्ता मिळावी म्हणून दावा केला होता. त्यामुळे सलीम कुत्ता मेला असताना नितेश राणे यांनी हा कोणता कुत्ता आणला आहे, असा टोला गोरंट्याल यांनी नितेश राणेंना लगावला आहे. तसेच राणे म्हणतात तो कुत्ता कोण आहे, गृहमंत्र्यांनी याची सभागृहाला माहिती द्यावी, अशी मागणीही आमदार गोरंट्याल यांनी केली आहे.

Kailas Gorantyal
Parliament Security Breach Case : तुमच्या मुलाला कोण भेटायचं? दिल्ली पोलिसांची अमोलच्या आई-बाबांकडे विचारणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com