DCM Devendra Fadnavis & RSS Chief Mohan Bhagwat Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis : संघ प्रमुखांसमोरच फडणवीसांनी सांगितलं, 'CM' होण्यापेक्षाही मोठा आनंद त्यांना का झाला ?

Expressed Feelings : उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या चिमुकल्यांसोबत ‘त्या’ क्षणाच्या भावना

Atul Mehere

Nagpur News : ‘एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री व्हावं असं कुणाला वाटणार नाही. ते पदच तितकं महत्वाचं असतं. मी देखील आयुष्यात मुख्यमंत्री झालो. पदावर कार्यरत असताना काही चिमुकल्यांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर आपण या मुलांना भेटलो. त्यावेळी त्यांनी मला गराडा घातला. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं होतं. या चिमुकल्यांनी मला थँक्यु काका, असं म्हटलं. हा आनंद सीएम झाल्याच्या आनंदापेक्षाही मोठा होता’, असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णसेवेतून मिळणाऱ्या समाधानाचं वर्णन केलं.

नागपूर येथील विवेकानंद स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनच्या सुवर्ण महोत्सव वर्षाला शुक्रवारी (ता. १७) खापरी येथे सुरुवात झाली. त्यावेळी फडणवीस बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. (DCM Devendra Fadanvis Shared His Experience In Front of RSS Chief Mohan Bhagwat at Nagpur)

खापरी येथील स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनमध्ये आपण बालपणी यायचो. त्यावेळी आपण स्वयंसेवक होतो. रेल्वेने येथे यावं. लागायचं. आता मात्र नागपूर शहराला हा भाग जोडला गेलाय. खापरीच्या आसपास गावं होती. या गावांचा, नागपूर शहराचा आणि स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचा इतिहास प्रेरणादायी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांमध्ये ती ताकद आहे, जी सामान्य व्यक्तीकडुनही असामान्य काम करून घेते. पुढे येणाऱ्या सर्व संघर्षांवर मात करीत आज संघाच्या अनेक संस्था उभ्या आहेत, असं फडणवीस म्हणाले.

ग्रामीण भागात सेवा देण्याचं स्वामी विवेकानंद मिशनच्या माध्यमातून झालय. कोविड आपत्ती काळातही सर्व डॉक्टरांनी सेवाभावानं काम केलं. आजच्या काळात मूलभूत गरजांमध्ये रोटी, कपडा, मकानसोबत आरोग्य सेवाही आलीय. राज्यात रुग्ण सेवेच्या अनेक योजना राबविण्यात येत आहेत. पण स्वयंसेवी संस्था जे ध्येय डोळ्यापुढे ठेवत काम करीत आहेत, ते खरोखर कौतुकास्पद आहे, असं फडणवीस म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संघ प्रमुख डॉ. मोहन भागवत म्हणाले की, अशा स्वयंसेवी संस्था काळाची गरज बनल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सामाजिक हिताचं कार्य करताना पुढे काय होईल याचा विचार न करता जिथे गरज होती तिथे कार्य सुरू केलय. पुढे हे काम असच सुरू राहण्यासाठी संवेदनशील असणं गरजेचं आहे. केवळ व्यवसायाभिमुख दृष्टिकोन ठेवणाऱ्या रुग्णालयांमध्ये गरीबांची सावलीही पोहोचत नाही. त्यामुळं सरकारी व सेवाभावी रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा दर्जेदार पद्धतीनं मिळायला पाहिजे.

Edited by : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT