Anil Deshmukh, Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Fadnavis Vs Deshmukh: Video फडणवीसांनी देशमुखांचा विषय एका वाक्यातच संपवला; म्हणाले, ‘झूट बोले कौवा काटे'...

Devendra Fadnavis Reply to Anil Deshmukh over Parambir Singh: राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर आरक्षणावर काय बोलले मला माहीत नाही. मात्र बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आरक्षण दिले ते टिकले पाहिजे.

Rajesh Charpe

Nagpur News: देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यात डील झाले होते. त्यानुसार मला गोवण्यात आले या माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या आरोपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी ‘झूट बोले कौवा काटे, काले कव्वे से डरियो‘ या एका वाक्यात हा विषय संपवला.

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर गाडीत बॉम्ब ठेवणाऱ्या गाडी मालकाची हत्या झाली. त्या घटनेचा मास्टर माईंड परमबीर सिंग होते. त्यांना अटक होणार होती. त्यामुळे ते फडणवीस यांना शरण गेले. त्यातून माझ्यावर आरोप लावण्याचे डील दोघांमध्ये झाल्याचे देशमुख यांनी सांगितले.

चांदीवाल आयोगाबाबत बोलताना फडणवीस यांनी तो अहवाल महाविकास आघाडीचे सरकार असताना आला होता असे म्हणाले. त्याच दरम्यान आमचे सरकार पाडण्यात आले. प्रत्येकाला ५० खोके देऊन सरकार भाजपने पाडले. त्यामुळे न्यायमूर्ती चांदीवाल यांनी सादर केलेला आहवाल जाहीर होऊ शकला नाही. तो दोन वर्षांपासून गृह खात्याकडे पडून आहे. देवेंद्र फडणवीस या खात्याचे प्रमुख आहेत. आपण यापूर्वीसुद्धा चांदीवाल आयोग जाहीर करण्याची विनंती दोन वेळा केली असल्याचे आज अनिल देशमुख म्हणाले. यास फडणवीस यांनी प्रत्त्युतर दिले.

मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर आरक्षणावर काय बोलले मला माहीत नाही. मात्र बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आरक्षण दिले ते टिकले पाहिजे, शेवटच्या व्यक्तीला आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी आमचा सरकार प्रतिबद्ध असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भाजपच्यावतीने विभागातील आमदारांची बैठका घेतल्या जात आहेत. त्यांच्या काय अडचणी आहे, त्या समजून घेत आहोत. विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आमची रणनीती काय आहे, याबद्दल त्यांच्याकडून फीडबॅक घेत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT