Devendra Fadanvis News
Devendra Fadanvis News sarkarnama
विदर्भ

Winter Session News : आघाडी चिडीचूप; फडणवीसच दिसले विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत!

सरकारनामा ब्यूरो

Winter Session News : विधान परिषदेत महापुरूषांच्या अपमानावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार गोंधळ झाला. दोन्हीकडील गोंधळानंतर आजच्या दिवसाचे विधान परिषदेचे कामकाज तहकूब करावे लागले. विषेश या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात सत्ताधाऱ्यांना धारेवर धरताना फडणवीस ज्या त्वेषाने बोलत होते, त्याच पद्धतीने त्यांनी आज विरोधकांवर निशाणा साधला.

त्यामुळे हिवाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत दिसल्याची चर्चा रंगली. महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात कायदा आणा अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी केल्यानंतर त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी विरोधातील काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा पाडा वाचून दाखवला.

छत्रपती शिवाजी महाराजा व इतर युग पुरूषांपेक्षा कोणीही मोठा नाही. उत्तर प्रदेशमध्ये युगपुरूषांचा अपमान करणाऱ्यांवर कायदा आणला आहे. तसाच कायदा आपणही आणाला पाहजे. कायदा झाल्यास महापुरूषांबाबत बोलतना प्रत्येकजण विचार करतील. मंत्री मंडळात नंबर लावण्यासाठी काही जण अशी वक्तव्य करत आहेत, असा आरोप अनिल परब यांनी केला. यावर बोलताना फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार आरोप केले.

यावेळी फडणवीस म्हणाले, कोणत्याच महापुरुषांचा अपमान होणे योग्य नाही. महापुरुषांचा अपमान होऊ नये यासाठी एक विधेयक आणण्याची मागणी काही दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. तसे पत्र देखील दिले. मात्र, विरोधकांकडून काही जणांनी मागणी केली की उदयनराजे खरचं शिवजी महाराज यांचे वंशज आहेत का? असेच एक महिला नेत्या म्हणाल्या की संजय राऊत यांच्या मातोश्री मा जिजाऊ सारख्या आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी सावरकरांना माफीवीर म्हणतात. राऊत शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करतात, त्या वेळी कोणी काहीच बोलत नाही, असे आरोप करत फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

तसेच शिवसेनेच्या नेत्या सुषणा अंधारे यांनी वारकरी संप्रदायबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना फडणवीस विरोधकांवर तुटून पडले. यावेळी ते म्हणाले, तुम्ही गाय मारली म्हणून आम्ही वासरू माराव हे योग्य नाही. सभागृहात वस्तूस्थिती मांडताना दोन्ही बाजूने मांडली गेली पाहिजे. ज्या वारकरी संप्रदायाने जातविरहीत समाज घडवला, त्यांना कधीही जात विचारली नाही, असेही फडणवीस म्हणाले.

कनाल यांनी शिवाजी महाराजांच्या फोटोच्या जागी आदित्य ठाकरे यांचा फोटो लावला होता. लालू प्रसाद यादव, बाळासाहेब ठाकरेंबद्दल काय बोलले होते? राहुल गांधी सावरकरांचा सतत अपमान करतात, असे फडणवीस म्हणाले. तसेच फडणवीस यांनी अंधारे यांनी देवतांबद्दल केलेल्या वक्तव्यांचा पाडाच वाचला. दोन्ही बाजुंनी जोरदार गोंधळ झाल्यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT