Devendar Fadnavis : भाजपचे नेते व राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या सुरक्षा व्यवस्थेत चोख पोलीस बंदोबस्त असूनही काही कार्यकर्त्यांनी पाटील यांच्यावर शाई फेकून हल्ला केला आहे. पाटील आज पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथे मोरया गोसावी महोत्सवासाठी उपस्थित होते.यावर आता ऱाज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्यावरील हल्ला हा दुर्देवी हल्ला आहे. पाटील यांच्या वक्तव्याचा आशय समजून घ्यायला हवे. त्यांच्या वक्तव्यातील काही शब्दावर विवाद होऊ शकतात. मात्र आशय हा होता की, आंबेडकर आणि भाऊराव पाटील यांनी सरकारी अनुदान न घेता, त्यांनी शिक्षणव्यवस्था निर्माण करण्यासाठी, समाजातील दानशूर लोकांची सोबत घेतली एवढंच त्यांना म्हणायाचं होतं. मात्र एका शब्दाला पकडून, असा हल्ला करणं, चुकीची गोष्ट आहे.
दरम्यान, पाटील यांनी पैठण येथे केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे उद्घाटन कार्यक्रमस्थळी तणाव होता. 'पाटील यांना शहरात पाउल ठेवू देणार नाही', असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला होता. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी प्रचंड पोलिस बंदोबस्त होता. पाटील सायंकाळी पाचच्या सुमारास मंदिर परिसरात आले.
उद्घाटन कार्यक्रमाला जाण्यापूर्वी भाजपचे (BJP) कार्यकर्ते मोरेश्वर शेंडगे यांच्या घरी पा़टील चहापानासाठी थांबले. यानंतर सहाच्या सुमारास घरातून बाहेर पडताच काही क्षणात अज्ञात व्यक्तिने त्यांच्या अंगावर शाई फेकली. यामुळे मोठा गोंधळ उडाला. पोलिसांची धावपळ उडाली. पाटील हे पुन्हा शेंडगे यांच्या घरी गेले. पोलिसांनी (Police) आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.