Chandrakant Patil News : राजकारण तापले : चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक

Chandrakant Patil News : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवडमध्ये शाई फेकण्यात आली
Chandrakant Patil News
Chandrakant Patil News Sarkarnama
Published on
Updated on

Chandrakant Patil News : भाजप नेते व राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या सुरक्षा व्यवस्थेत चोख पोलीस बंदोबस्त असूनही काही कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून हल्ला केला आहे. चंद्रकांत पाटील हे आज पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथील गावात मोरया गोसावी महोत्सवासाठी उपस्थित होते.

त्यादरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्ला झाला. पाटील यांच्यावर शाई फेक हल्ला झाल्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी उपस्थित दाखल झाले.

Chandrakant Patil News
Himachal Pradesh : सुखविंदर सिंग सुखू होणार नवे मुख्यमंत्री; थोड्याच वेळात होणार घोषणा

पाटील यांनी सोमवारी पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. या पार्श्वभूमीवर संपुर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. चिंचवडमधील श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी समाधी महोत्सव आजपासून सुरु होत आहे. त्याचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे संयोजकांनी गुरुवारी जाहीर केले होते.

दरम्यान, पाटील यांनी पैठण येथे केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे उद्घाटन कार्यक्रमस्थळी तणाव होता. 'पाटील यांना शहरात पाउल ठेवू देणार नाही', असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला होता. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी प्रचंड पोलिस बंदोबस्त होता. पाटील सायंकाळी पाचच्या सुमारास मंदिर परिसरात आले.

Chandrakant Patil News
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांचे चंद्रकांत पाटलांना खोक्याच्या भाषेत सडेतोड उत्तर

उद्घाटन कार्यक्रमाला जाण्यापूर्वी भाजपचे (BJP) कार्यकर्ते मोरेश्वर शेंडगे यांच्या घरी चहापानासाठी थांबले. यानंतर सहाच्या सुमारास घरातून बाहेर पडल्यावर काही क्षणात अज्ञाताने त्यांच्या अंगावर शाई फेकली. यामुळे मोठा गोंधळ उडाला. पोलिसांची धावपळ उडाली. पाटील यांना पुन्हा शेंडगे यांच्या घरी गेले. पोलिसांनी (Police) आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com