BJP further focused on social media team : शहरात भाजपचे सोशल मीडियाचे जाळे चांगलेच मजबूत आहे. त्यात आता शहरातील सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर्सची भर पडणार आहे. नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील सोशल मिडिया इन्फ्लूएऩ्सर्सना देवगिरी बंगल्यावर निमंत्रित करून चर्चा केली. (Influencers were invited to Devagiri Bungalow and discussed)
लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या तयारीचाच हा भाग असल्याची चर्चा आहे. सोशल मिडियावरून प्रचार, प्रसाराचे तंत्र वापरून भाजप २०१४ मध्ये केंद्र व राज्यातही सत्तेत आली. त्यानंतर भाजपने सोशल मिडिया टिमवर आणखी लक्ष केंद्रित केले.
इतर पक्षांनीही सोशल मिडियाचा वापर सुरू केला असला तरी भाजप यात दादा असल्याचे २०१९ मधील विधानसभा, लोकसभा निवडणुकीतही स्पष्ट झाले. पुढे लोकसभा, विधानसभेसोबतच नागपूर महापालिकेचीही निवडणूक होणार आहे. भाजपने नुकताच प्रत्येक लोकसभा व विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुखांची नियुक्ती केल्याने महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.
कार्यकर्त्यांची मोठी कुमक असलेला भाजप (BJP) सोशल मिडिया आणखी बळकट करण्याच्या प्रयत्नात आहे. शहरात गेल्या काही वर्षांत सामाजिक तसेच नागरिकांच्या हित लक्षात घेता काम करणारे सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर्स मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत. विविध क्षेत्रांत काम करताना समाजातील घडामोडीवरही बारीक नजर ठेऊन विश्लेषणात्मक चार ओळी सोशल मिडियावर लिहून लोकांचे लक्ष वेधणाऱ्या इन्फ्लूएन्सर्सना पुढील निवडणुका बघता भाजपने एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांपूर्वी रात्री या इन्फ्लूएन्सर्सना नागपुरातील (Nagpur) देवगिरीवर निमंत्रित केले. त्यांच्याशी जवळपास तास-दीड तास चर्चा केली. शहरातील जवळपास १५ ते २० सोशल मिडिया इऩ्फ्लूएन्सर्सनी फडणवीस यांच्याशी संवाद साधला. शहरातील पर्यावरण, नोकरीच्या संधी, शिक्षणासोबत नाइट लाइफवरही चर्चा झाली.
यावेळी या इऩ्फ्लूएन्सर्सनी फडणवीस यांना प्रश्नही विचारले. पुढील काळात सोशल मीडियाचा सकारात्मक वापर कसा करता येईल, यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला फडणवीस यांनी दिल्याचे एका इन्फ्लूएन्सर्सने नमूद केले.
यावेळी काही इन्फ्लूएन्सर्सनी फडणवीस (Devenda Fadanvis) यांना सध्या सोशल मिडियावरून सुरू असलेल्या नकारात्मक बाबी वाढत असल्याबाबत सांगितले. यावर फडणवीस यांनी ‘देव तेथे दानव असतोच’ असे सूचक उत्तर दिल्याचे एका सोशल मीडिया इन्फ्लूएसर्सने सांगितले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.