Devendra Fadanvis on NCP: शरद पवारांनी भाकरी फिरवली नाही...; फडणवीसांचं मोठं विधान

Maharashtra Politics : नागपूर दौऱ्यावर असलेल्या फडवीसांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
Devendra Fadanvis on NCP:
Devendra Fadanvis on NCP:Sarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरविली असं म्हणतात. मात्र, त्यांच्या निर्णयाला भाकरी फिरवणे म्हणता येणार नाही, तर ही धुळफेक आहे. परंतु हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शनिवारी (१० जून) दिल्लीत खासदार प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पवारांनी ही घोषणा केली.त्यांच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात चर्चंना उधाण आले आहे.

Devendra Fadanvis on NCP:
Ashadhi Wari: आळंदीत माऊलींच्या मंदिरात पोलीस- वारकऱ्यांमध्ये झटापट...; वाचा, नेमकं काय झालं?

नागपूर दौऱ्यावर असलेल्या फडवीसांनी (Devendra Fadanvis) राष्ट्रवादीवर (NCP) निशाणा साधला आहे. 'मी नागपूर जिल्ह्याच्या मतदारसंघनिहाय दौरा करत.जिल्ह्यातूल सर्व तालुक्यांच्याही आढावा घेत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना, सरकार आपल्या दारी योजनेची माहिती, घरकुलाच्या योजना आहेत, लोकांचे वैयक्तिक प्रश्न आणि अडचणींचा आढावा घेतला आहे. या आढाव्यामुळे अनेक गोष्टींची माहिती घेत आहे. (Maharashtra Politics)

नागपुरात कामाची प्रगती संथ गतीने सुरु होती पण अधिकाऱ्यांना वेगाने कामे करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.यापुढे जे अधिकारी मागे राहिले, ते जोमाने काम करतील. जिल्हाधिकाऱ्यांनाही अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे फडणवीसांनी सांगितले. दरम्यान काही नगरपालिकांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामांची प्रगती अतिशय संथ आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कामाच्या प्रगतीवर फडणवीस काय कारवाई करणार, हे पाहाणे महत्त्वाचे ठऱणार आहे.

Edited by- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com