Devendra Fadanvis
Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis News: आम्ही छत्रपतींचे मावळे, गनिमी कावा केला आणि किल्ला परत मिळवला !

सरकारनामा ब्यूरो

Devendra Fadnavis Criticizes Uddhav Thackeray : २०१९मध्ये उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जात महाविकास आघाडी स्थापन करून महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली आणि ते स्वतः मुख्यमंत्री बनले. त्यावेळी भाजपला खासकरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना मोठा झटका बसला होता. नंतरच्या काळात फडणवीसांनी महाविकास आघाडीला त्याहीपेक्षा मोठा झटका देत ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्यास भाग पाडले होते. (BJP leader Devendra Fadnavis suffered a big blow)

ते शल्य आजही फडणवीसांच्या मनात आहे. आज (ता. १९) नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे त्यांनी त्या घटनेचा उल्लेख केला. ते म्हणाले, २०२४ मध्ये नरेंद्र मोदी याहीपेक्षा ताकदीने पुढे येणार आहेत, त्यांना मग कुणीही हरवू शकणार नाही. राज्यात पुन्हा एकदा आपलं सरकार आलं आहे. २०१९मध्ये आपल्यासोबत बेईमानी झाली, पाठीत खंजीर खुपसण्यात आला होता.

आपणही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, मग आपणही गनिमी कावा केला आणि आपला किल्ला परत मिळवला. ज्यांनी बेईमानी केली होती, त्यांना बाजूला ठेवलं आणि वैचारिक मित्र होते, त्यांना सोबत घेतलं. पुन्हा एकदा शिवसेना-भाजपचं सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आणलं. यावरून त्यांना चांगला धडा मिळाला आहे.

२०२४च्या निवडणुकांमध्ये आपल्याला एक फायदा आहे की, बावनकुळे साहेब ज्यावर सही करतील, तो फॉर्म फायनल आहे. तुमचं सगळ्यांचं म्हणणं एकदा ऐकून घेतलं, की बावनकुळे माझंही ऐकणार नाहीत. त्यामुळे आता सावनेरच्या बाबतीत तुम्हालाच निर्णय घ्यायचा आहे, असं ते कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

देशात नरेंद्र मोदींचे सरकार (Modi Government) नऊ वर्ष पूर्ण करत आहे. या सरकारने ज्या प्रकारे नवीन भारताची (India) निर्मिती केली. गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला आहे. २०१४ ते २०२३ या काळात अतिगरीबी १ टक्कादेखील आता राहिलेली नाही. पुढचे पाच वर्ष मोदी या देशाला अत्युच्च शिखरापर्यंत घेऊन जाणार आहेत. त्यासाठी तुमचं एक वर्षाचं समर्पण पाहिजे आहे. यावर्षीचे लोकसभा निवडणुकीच्या आधीचे सहा महिने पुढच्या वर्षीचे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीचे सहा महिने. हे तुम्ही करावे, असे आवाहन फडणवीसांनी (Devendra Fadanvis) केले.

ओबीसींकरीता (OBC) मोदी आवास योजना सुरू केली. ओबीसींसाठी १० लाख घरं बांधत आहोत. त्यातले तीन लाख घरं याच वर्षी बांधणार आहोत. याशिवाय शेतकऱ्यांना प्रत्येक संकटात मदत केली. अतिवृष्टी, गारपीट आदी नुकसानाची भरपाई त्यांना दिली आहे. यापुढेही शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्‍नासाठी सरकार तत्पर असल्याची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT