Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis : 'महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे कायम राहिले असते, तर...' ; फडणवीसांचं वक्तव्य!

Devendra Fadnavis on VidhanSabha Election : 'आज आपल्याला विधानसभेचा निकाल जो आपल्या बाजूने दिसत आहे, तो...' असंही फडणवीस म्हणाले आहेत.

Rajesh Charpe

Devendra Fadnavis on Mahayuti : भाजपने शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन महायुतीचे सरकार स्थापन केल्याने भाजपच्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. ती पदोपदी दिसत आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा विरोधात गेलेला निकालाससुद्धा हेच कारण महत्त्वाचे असल्याचे तर्क लावल्या जात आहे. याचे उत्तर आज नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिले.

फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले, 'राज्यात पाच वर्षे भाजपचे सरकार होते. या दरम्यान अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. महाराष्ट्रासह विदर्भाच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केले होत्या. मात्र महाविकास आघाडीने ते बंद पाडण्याचे काम हाती घेतले होते. भाजपच्या नेत्यांचे खच्चीकरण सुरू केले होते. पाच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार कायम राहिले असते, तर आगामी विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी आपल्याला प्रचंड संघर्ष करावा लागला असता.'

तसेच 'आज आपल्याला विधानसभेचा निकाल जो आपल्या बाजूने दिसत आहे तो महायुतीचे सरकारामुळे आहे. या दरम्यानही आपण राज्याच्या विकासाचे आणि सर्वासामान्यांचे हिताचे निर्णय घेतले आहे. त्यामुळे पुढचे पाच वर्षे आपलेच सरकार येणार आहे.' असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या(BJP) कार्यकर्ता बैठकीत सांगितले.

याचबरोबर , 'लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांचे खोटे नॅरेटिव्ह मतदारांच्या लक्षात आले आहेत. जो समाज आणि शेतकरी भाजपच्या विरोधात गेला होता त्यांना त्यांची चूक आता लक्षात आली आहे. संविधान कोणी बदलू शकत नाही ही भीती ता आता जनतेच्या मतानतून निघून गेली आहे. त्यामुळे दलित व आदिवासी बांधवा हेसुद्धा सकारात्मक झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शेतकऱ्यांचे काही प्रश्न होते तेही केंद्र व राज्य सराकारने सोडवले आहेत. एकंदरित विधानसभेच्या निवडणूक महायुतीसाठी परिवर्तनाची ठरणार आहे.' असा विश्वास यावेळी फडणीस यांनी व्यक्त केला.

याशिवाय 'आरोप करणे आणि खोटे नॅरेटिव्ह निर्माण करणे हे विरोधकांचे कामच आहे. ते प्रत्येकच गोष्टीत नकारात्मकता शोधत असतात. आता आपणही त्याची माहिती घेऊन प्रत्त्युतर दिले पाहिजे. २०१४च्या निवडणुकीत भाजपने विदर्भातील ४२ जागा जिंकल्या होत्या. तीच परिस्थिती आज आहे. हीच ग्राऊंड रिॲलिटी आहे. आता फक्त नेत्यांनी निवडणुकीची जबाबदारी घेतली पाहिजे. बुथ प्रमुख, शक्ती प्रमुखांवर निवडणूक सोडून देऊ नका.' असे आवाहन करून फडणवीस यांनी आपण पुन्हा महाराष्ट्र जिंकू शकतो असा विश्वास व्यक्त केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT