नागपूर : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर झाले. यामध्ये भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय खाते देण्यात आले आहे.
सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे भाजप-शिवसेना (Shiv Sena) युतीच्या 2014 ते 2019 या काळात वनविभागासोबतच अर्थ खात्याचासुद्धा कारभार होता. यावेळी त्यांच्याकडे वने राहो न राहो पण अर्थ खाते निश्चितपणे राहील, अशी चर्चा होती. त्यांच्या समर्थकांनाही तशी अपेक्षा होती. मात्र, आज झालेल्या खाते वाटपामध्ये अर्थ व नियोजन हे खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे गेले.
त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांचेही पंख छाटले जात आहे, अशी चर्चा लगेच सुरू झाली. मात्र, वास्तविक पाहता असे अजिबात नाही तर तीन महिन्यांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी सुधीर मुनगंटीवार यांना म्हटले होते की, 'सुधीरजी यावेळी मला अर्थ खात्याचा अनुभव घ्यायचा आहे...' त्यावर 'कुठल्याही खात्याचे काम निवडण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे देवेंद्रजी...' असे उत्तर मुनगंटीवार यांनी दिले होते.
आपल्याला आवडत असलेल्या खात्याचा मंत्री होणे हा आपला हक्क आहे, असेही मुनगंटीवार यांनी फडणवीस यांना सांगितले होते. भाजपमधील एका नेत्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ही माहिती 'सरकारनामा'ला दिली. तसेही वनविभाग हा सुधीर मुनगंटीवार यांच्या आवडीचा विषय आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे मुनगंटीवार यांना कमी महत्त्वाचे खाते देऊन त्यांचे पंख छाटले, ही चर्चा निरर्थक ठरते, असे या नेत्याने सांगितले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही अत्यंत महत्त्वाची खाती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.