सुधीरभाऊंना 'वनवास' रवींद्र चव्हाण 'डार्क हॅार्स'

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज जाहीर केले.
Ravindra Chavan, Sudhir Mungantiwar
Ravindra Chavan, Sudhir Mungantiwarsarkarnama

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज जाहीर केले. खातेवाटपामध्ये महत्त्वाची खाती ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे गेली आहेत. तर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना काहीसा धक्का बसला आहे.

सुधीर मुनगंटीवार यांना वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय ही खाती मिळाली आहेत. मागील युती सरकारमध्ये त्यांच्याकडे अत्यंत महत्त्वाचे असे अर्थ खाते होते. त्यामुळे या मंत्रीमंडळातही त्यांना मोठी जबाबदारी मिळेल असे सांगितले जाते होते. मात्र, त्यांना वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय हे खाते मिळाले आहे. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांचे पंख छाटले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Ravindra Chavan, Sudhir Mungantiwar
‘बंडानंतरचे सुरुवातीचे तीन दिवस मी एक मिनिटसुद्धा झोपलो नव्हतो’

तर रवींद्र चव्हाण यांच्याकडे मात्र, मोठी जवाबदारी आहे. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अशी महत्त्वाची खाती देण्यात आली आहे. त्यामुळे सरकारमधील त्यांचे वजन अधोरेखीत होते. देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ्या मंत्र्यांना वजनदार खाती मिळाल्याची चर्चा आहे. सुधीरभाऊंना ग्रामवीकास सारखे जनतेशी थेट संबंधीत खाते हवे होते. मात्र, ते त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात समन्वयाची जबाबदारी स्विकारली होती. त्याची बक्षीसी त्यांना मिळाली आहे. चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या महत्त्वानुसार महसूल खाते अपेक्षीत होते. तेथे त्यांच्या पदरी निराशा आली आहे.

दरम्यान, त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही अत्यंत महत्त्वाची खाती आहेत.

इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:

सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील : महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

चंद्रकांत पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित : आदिवासी विकास

गिरीष महाजन : ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे : बंदरे व खनिकर्म

Ravindra Chavan, Sudhir Mungantiwar
मोठी बातमी : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

संजय राठोड : अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे : कामगार

संदीपान भुमरे : रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत : उद्योग

प्रा. तानाजी सावंत : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

अब्दुल सत्तार : कृषी

दीपक केसरकर : शालेय शिक्षण व मराठी भाषा

अतुल सावे : सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई : राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा : पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com