Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

Fadanvis On Vajramooth Sabha: वज्रमूठ बांधून फायदा काय? तिघांची तोंडे तीन दिशांना !

सरकारनामा ब्यूरो

BJP's Meeting at Risod, Washim : महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्रातील पहिली वज्रमूठ सभा यशस्वी ठरली. त्यानंतर नागपूर येथे येत्या रविवारी दुसरी वज्रमूठ सभा आयोजित करण्यात आली आहे. तेव्हापासून भाजप नेते प्रत्येक भाषणात वज्रमूठ सभेचा उल्लेख करीत आहेत. कालही वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथील भाजपच्या संकल्प मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वज्रमूठ सभेवरून महाविकास आघाडीवर टिका केली. (Devendra Fadnavis Criticized Mahavikas Aghadi from Vajramooth meeting)

विरोधी पक्ष वज्रमूठ बांधून फिरत आहे परंतु तिघांची तोंडे तीन दिशेला असल्यामुळे त्यांच्यात ताळमेळ नसून वैफल्यग्रस्त झाला आहे असे उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिसोड येथील संकल्प सभेमध्ये काढले. माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या भाजप प्रवेशानंतर रिसोड येथे संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या भाजप प्रवेशाने या भागात भाजपला बळकटी मिळणार आहे. या मतदारसंघाबरोबरच वाशीम जिल्ह्यासाठी भरीव निधी देणार आहे. विरोधी पक्षांमध्ये सध्या वैफल्य निर्माण झाले असून वज्रमूठ बांधून फिरत आहेत. परंतु त्यांच्यात ताळमेळ नाही. काँग्रेस पक्ष आमच्या पाठीशी येत आहे. मोदी यांच्यावर विश्वास ठेवून दररोज कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश होत आहेत.

शेतकऱ्यांसाठी (Farmers) विविध योजना राबविल्या जात आहेत. समृद्धी महामार्गामुळे या भागात समृद्धी निर्माण होत असून पोहरादेवीच्या विकासाकरिता ४०० कोटी निधी मंजूर केला आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा दिला तसेच यावर्षीपासून शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पीक विमा देण्यात येणार आहे. अतिवृष्टीचे निकष बदलण्यात आले आहेत. ओबीसीकरिता (OBC) मोदी आवास योजना निर्माण करण्यात आली आहे. गाव तांड्यापर्यंत रस्ते करण्यात येणार आहेत.

महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येत असून लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा विश्वास वाढत आहे. मागील पंधरा वर्षापासून अनंतराव देशमुख यांची उपेक्षा होत होती, ती आता थांबली असून त्यांच्या माध्यमातून या भागाचा विकास होणार आहे. त्याकरिता भरीव निधी उपलब्ध केल्या जाईल असेही उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितले. यावेळी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नकुल देशमुख यांनी केले. यावेळी व्यासपीठावर आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, माजी आमदार विजयराव जाधव, आमदार लखन मलिक, आमदार हरीश पिंपळे, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार निलय नाईक, माजी आमदार रणजीत पाटील, नकुल देशमुख, गजानन देवळे, विजयमाला आसनकर हे होते.

(Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT