
Devendra Fadanvis Ayodhya visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांसह अयोध्येमध्ये दाखल झाले. अयोध्येत प्रभु श्री रामाचं दर्शन घेणार आहेत. पण या दौऱ्यात एक मोठा ट्विस्ट आला आहे. (Devendra Fadnavis told the reason behind Ayodhya visit)
दौऱ्याची घोषणा झाल्यापासून हा दौरा फक्त शिवसेनेचा अयोध्या दौरा असल्याचं सांगितलं जात होतं.मुख्यमंत्री शिंदेंच्या स्वागतासाठी अयोध्येत मोठी तयारी करण्यात आली. एकनाथ शिंदे अयोध्येत दाखल होताच इकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadanvis) अयोध्या दौऱ्यावर निघाले आहेत. नुकतेच ते अयोध्येत दाखल झाले. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
खुप दिवसांपासून मला रामलल्लांचं दर्शन घेण्याची इच्छा होती.त्यासाठी मी आज इथे आल्याचं त्यांनी फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. पण दुसरीकडे , दौऱ्यामागे कोणती राजकीय खेळी तर नाही ना, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. याशिवाय एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अयोध्या दौऱ्याची वातावरण निर्मिती कऱण्यात शिंदे यशस्वी झाल्याने भाजप या दौऱ्यात सहभागी झाल्याचीही चर्चा आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपचेही सर्व मंत्री या अयोध्येत पोहचले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपचे मंत्री गिरीश महाजन, मोहित कंबोज आणि आमदार संजय कुटेही गेले होत. पण एकनाथ शिंदे अयोध्येत पोहचेपर्यंत देवेंद्र फडणवीसही या दौऱ्याला येणार असल्याचं कुणालाही माहिती नव्हतं. पण फडणवीसांच्या या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.