Winter Session News : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यांवरुन विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरकारी पक्षाच्या वतीने स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधी पक्षाच्या आरोपांना प्रत्युत्तरे दिली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी राज्यमंत्र्यांच्या बंगल्यांच्या रंगरंगोटीवरुन सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, फडणवीसांच्या युक्तिवादापुढे त्यांचा मुद्दा तोकडा पडला. तर दुसरीकडे तुम्हाला मंत्री व्हायचे का? अशी थेट ऑफरच फडणवीसांनी प्रभूंना दिली. एकप्रकारे शिंदे गटात येण्याचे निमंत्रणच दिले, असल्याचे सांगितेल जात आहे. फडणवीसांच्या या खुल्या ऑफरनंतर सभागृहात एकच खसखस पिकली.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने आक्रमक पणा दाखवला. अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वीच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी ५० खोके सगळे ओके, सीमाभागावर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो...अशा घोषणांनी सभागृहाचा परिसर दणानून सोडला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमाप्रश्नावरुन सरकारला बॅटफूटवर ढकलण्याचा प्रयत्न केला. अजितदादांना भुजबळांचीही जोरदार साथ मिळाली. पुढे विरोधी पक्षाचा आवाज आक्रमक असतानाच ठाकरे गटाचे आमदार प्रभू यांनीही राज्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या रंगरंगोटीवरुन सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला.
प्रभू यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. विद्यमान स्थितीत राज्य सरकारमध्ये एकही राज्यमंत्री नसताना नागपूर अधिवेशनात राज्यमंत्र्यांचे बंगले कसे काय सजवले गेलेले. असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मात्र, प्रभूंचा प्रश्न संपतो ना संपतो तोच फडणवीसांनी त्यांच्या प्रश्नातली हवाच काढून घेतली.
फडणवीस म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाला कुठे माहिती आहे की आम्ही मंत्रिमंडळ विस्तार कधी होणारेय ते? तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. आम्ही अधिवेशन सुरु असतानाही मंत्रिमंडळाचा विस्तार करु शकतो, असे फडणवीसांनी सांगितले. राहिला विषय मंत्र्यांच्या बंगल्यांच्या रंगरंगोटीचा, तर प्रत्येक अधिवेशनात अशी रंगरंगोटी होत असेत. त्याचा खर्च लाखो-करोडो वगैरे नसतो.
दरम्यान, लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करा...असा टोला प्रभू यांनी फडणवीस बोलत असतानाच हाणला, त्यावर तुम्हाला व्हायचे आहे का मंत्री, पाहिजे का संधी? असे प्रत्युत्तर फडणवीसांनी दिले त्यामुळे सभगृहात एकच हशा पिकला. यामुळे प्रभू बॅकफूटवर केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.