Shahaji Bapu Patil: अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या शहाजी बापूंसमोर 'ही' वेगळीच अडचण; म्हणाले...

ShahajiBapu Patil: अधिवेशनासाठी राज्यातील अनेक मंत्री, आमदार नागपुरात दाखल...
Shahaji Bapu Patil|
Shahaji Bapu Patil|Sarkarnama
Published on
Updated on

Shahaji Bapu Patil: एकनाथ शिंदेंच्या बंडात पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यांच्यासोबत सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे होते. पण त्यांना खरी प्रसिध्दी गुवाहाटीला गेल्यानंतर मिळाली. तिथे काय डोंगर, काय झाडी, काय हाटेल हा त्यांचा डायलाॅग व्हायरल झाला आणि बापूंना जागतिक पातळीवर ओळख मिळाली. आता त्याच बापूंना राहण्यासाठी हाॅटेल मिळत नाहीय. त्यामुळे त्यांची अडचण झाली आहे.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला आजपासून (दि.19) सुरुवात झाली आहे. या अधिवेशनासाठी राज्यातील अनेक मंत्री, आमदार नागपूरात दाखल झाले आहेत. त्यात शिंदे गटाचे नेते आणि सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील ( Shahaji Bapu Patil) अधिवेशनासाठी आपल्या सुरक्षा कर्मचार्यांसह नागपुरात आले आहेत. पण त्यांच्या मुक्कामाची सोय झालेली नाही. यावर बापूंनी मनमोकळी प्रतिक्रिया दिली आहे.

Shahaji Bapu Patil|
Nagpur politics News: भाजप आमदाराचा प्रताप; अधिकाऱ्यांना आधिकाऱ्यांना न जुमानता ७०० कोटींचं कंत्राट पळवलं!

आमदार शहाजी बापू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बापूंना त्यांच्या हाॅटेलातील मुक्कामाविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते बोलत होते. बापू म्हणाले, मी नागपुरात कधीही कोणत्याही हॉटेलमध्ये राहिलो नाही. नागपुरात माझे अनेक मित्र आहेत. येथे किमान २०० घरं अशी आहेत, जिथे मी मुक्काम करु शकतो. पण माझे एक-दोन आमदार मित्र कुठे राहत आहेत, त्यांच्याशी बोलून कुठे राहायचं ते ठरवणार आहे. झाडी आणि हॉटेल सगळीकडे आहेत. महाराष्ट्राला तर झाडी आणि डोंगराचं वैभव लाभलं आहे असंही बापूंनी यावेळी सांगितलं.

Shahaji Bapu Patil|
MPSC News : भारत जोडोनंतर युवक काँग्रेस अॅक्शन मोडवर; एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी एल्गार

विधिमंडळात जाऊन सही केल्यानंतर आपण कुठे राहणार? हे ठरवणार आहे. हिवाळी अधिवेशनासाठी अजून कुठे थांबलेलो नाही. बॅग अजूनही गाडीतच आहे. मी आधी विधिमंडळात जाऊन सही करणार आहे. त्यानंतर हॉटेल किंवा आमदार निवासात राहण्याचा माझा विचार आहे. माझ्याबरोबर सोलापूरहून पाच-सहा पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी आले आहेत. त्यांची राहण्याची सोय कुठे करायची हे मी बाहेर आल्यावर ठरवणार आहे अशी प्रतिक्रिया शहाजीबापू पाटलांनी दिली.

...तर ताडोबाला जाणार : शहाजीबापू पाटील

माझ्या जीवनाची ६६ वर्षे उलटली पण मी अजून ताडोबा व्याघ्र प्रकल्प पाहिला नाही. मला एकदा ताडोबालाही जायचं आहे. विठ्ठलाच्या कृपेने जेव्हा योग जुळून येईल, तेव्हा मी ताडोबाला जाणार आहे. या अधिवेशनात मला नागपूरची झाडी किती बघायला मिळतीय, हे मला सांगता येणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com