Devendra Fadnavis Eknath Khadse  sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis : एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश निश्चित? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली तारीख

Devendra Fadnavis Eknath Khadse BJP: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एकनाथ खडसे महसूलमंत्री होते. तेव्हापासूनच या दोन्ही नेत्यांमध्ये वादाला सुरूवात झाली होती. नंतर खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Rajesh Charpe

Devendra Fadnavis News : एकनाथ खडसे लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांची साथ सोडून भाजपात परतले. मात्र त्यांना अद्याप भाजपने अधिकृत प्रवेश दिला नाहीत. त्यामुळे ते प्रचंड संतापले आहेत. त्यांनी पुन्हा शरद पवार गटात जाण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय राज्यातील दोन नेते त्यांचा प्रवेशाला अडथळा आणत असल्याचा आरोप खडसेंनी केला.

खसडेंचा भाजपमध्ये प्रवेश कधी होणार, याची माहिती खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिली आहे. तसेच खडसेंनी केलेल्या आरोपाबद्दल काही माहीत नसल्याचे सांगत फडणवीसांनी कानावर हात ठेवले.

नागपूरमध्ये पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, खडसे यांच्याबाबतच निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे. त्यांचा निर्णय आम्हा सर्वांना मान्य आहे. गणेश विसर्जनानंतर केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करू आणि निर्णय घेऊ. त्यामुळे 17 सप्टेंबरनंतर खडसेंच्या भाजप प्रवेशावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एकनाथ खडसे महसूलमंत्री होते. तेव्हापासूनच या दोन्ही नेत्यांमध्ये वादाला सुरूवात झाली होती. एका जमिनीच्या प्रकरणात खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासूनच ते भाजपवर नाराज होते. शेवटी त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. त्यांना राष्ट्रवादीने विधान परिषदेससुद्धा पाठवले आहे.

लोकसभेत भाजपला साथ

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना लोकसभेची उमेदवारी देऊन त्यांना कोंडीत पकडले. खडसे पुन्हा भाजपमध्ये परतले. त्यांनी आपल्या सुनेला निवडूनसुद्धा आणले. असे असले तरी त्यांना अद्यापही भाजपने पक्षात अधिकृत प्रवेश दिलेला नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या खडसे यांनी अलीकडे फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर तोफ डागली.

शरद पवार गटाला परतण्याचे संकेत

फडणवीस आणि गिरीश महाजन हे दोघे मोदी-शहा यांच्यापेक्षा मोठे आहेत, अशी टीका खडसे यांनी केली होती. तसेच पुन्हा शरद पवार गटात परत जाण्याचा त्यांनी इशारा दिला आहे. या घडामोडींवर देवेंद्र फडणवीस यांनी सावध भूमिका व्यक्त करून हात झटकले आहे. आता केंद्रीय नेतृत्व कार्य निर्णय देते यावर एकनाथ खडसे यांचे भवितव्यअवलंबून राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT