Bhupendra Yada
Bhupendra Yadasarkarnama

Video BJP Politics : लोकसभेतून धडा, विधानसभेसाठी भाजपचा प्लॅन ठरला, केंद्रीय मंत्री महाराष्ट्रात...

BJP Politics Bhupendra Yadav Assembly Elections : लोकसभेतील सुमार कामगिरीनंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व सक्रिय झाले आहे. महाराष्ट्राची प्रभारी पदाची जबाबदारी केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांना देण्यात आली.
Published on

BJP Politics : नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होणार हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे भाजपकडून विधानसभेची जोरदार तयारी केली जात आहे. अमित शाह हे नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले. त्यांनी देखील निवडणुकीचा आढाव घेतला. मात्र, विधानसभेची खास जबाबदारी केंद्रीय मंत्री, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव यांच्यावर असणार आहे.

भुपेंद्र यादव हे आठवड्यातील दोन दिवस महाराष्ट्रात असणार आहेत. ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत विधानसभा निवडणुकीची तयारी करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला. भाजपचे 9 खासदार विजयी झाले. मात्र, महायुतीला फक्त 17 जागांवर समाधान मानावे लागले. लोकसभेतील सुमार कामगिरीनंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व सक्रिय झाले आहे. महाराष्ट्राची प्रभारी पदाची जबाबदारी केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांना देण्यात आली.

भुपेंद्र यादव यांच्यासोबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर सहप्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. हे दोन्ही नेते गृहमंत्री अमित शाह यांच्या खास मर्जीतले मानले जातात. यांच्या मार्फत अमित शाह हे महाराष्ट्राच्या निवडणुकीवर लक्ष ठेऊन असणार आहेत.

Bhupendra Yada
Ahmednagar City Assembly Constituency : अजितदादांच्या 'नगरी' भिडूविरोधात 'मविआ'तून कोण? शिवसैनिकांनी घेतली राऊतांची भेट

पक्ष संघटनेकडे विशेष लक्ष

भुपेंद्र यादव हे केंद्रीय मंत्री असले तरी विधानसभेच्या तयारीसाठी ते आठवड्यातील दोन दिवस महाराष्ट्रात असणार आहेत. या दोन दिवसांमध्ये ते भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक करणार आहेत.

भाजप 'अ‍ॅक्शन मोड'वर

महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव हे आठवड्यातून दोन दिवस महाराष्ट्रात थांबणार आहेत. तसेच प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी तसेच त्याचा अहवाल वरिष्ठांना देण्यासाठी बाहेरील राज्यातील भाजप नेते कार्यकर्त्यांची फौज महाराष्ट्रात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघातील आढाव गुजरातमधील भाजप नेते घेत आहेत. तर, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही मतदारसंघांचा आढावा छत्तीसगडमधील नेत्यांकडून घेण्यात येतो आहे. हे नेते आपला अहवाल वरिष्ठांना देणार आहेत.

Bhupendra Yada
Ajit Pawar : अजितदादांची गृहमंत्री शहांसोबत चर्चा अन् मोदी सरकारकडून प्रश्नच 'सॉल्व'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com