Devendra Fadnavis, Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

Gadchiroli : फडणवीसांनी व्यक्त केले मुख्यमंत्र्यांचे आभार; नेमके कारण कळले का?

Atul Mehere

Women's Empowerment : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची तोंडभरून स्तुती करीत त्यांचे आभारही मानले. गडचिरोली येथे मंगळवारी (ता. 9) महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी शिंदे यांच्या कामांचे कौतुक केले.

फडणवीस म्हणाले, की मुख्यमंत्री याचे आभार मानतो, की त्यांनी महिला मेळाव्याची संधी गडचिरोली जिल्ह्याला दिली. राज्यातील महिलांचे सशक्तीकरण होत आहे. शिक्षण, आरोग्य मिळत नाही तोपर्यंत भारत विकसित होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

पंतप्रधान यांनी अनेक महत्त्वाच्या योजना राबविल्या आहेत. 25 कोटी उद्योजकांना कर्ज मिळाल्याने लोक आता उद्योजक झाले आहेत. यात 13 कोटी महिला त्यांच्या पायावर उभ्या झाल्या आहेत. महिला सशक्त होते, तेव्हा परिवार सशक्त होतात. कोणतीही महिला व्यसनात पैसे घालवत नही. उलट त्या येणाऱ्या पैशातून बचत करीत त्याचा योग्य उपयोग करतात. पुरुष सक्षम झाले तरी त्यातील अनेक व्यसनांवर पैसे घालवत असतात. पण महिला तसे करीत नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुलगी जन्माला आली, की घर लखपती होते. यासाठी सरकार लेक लाडकी योजना राबवित आहे. महिलांना कर्ज दिले तर त्या कर्ज कधीच बुडवत नाहीत. पुरुषांना ते दिले तर अनेक जण बुडवतात, म्हणून महिलांसाठी जास्त योजना तयार केल्या जातात. सरकारने नवीन महिला धोरण तयार केले आहे. त्यातून लाखो महिलांना मदत मिळाली आहे. महिलांसाठीचे अभियान 365 दिवस चालणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एका वर्षात महाराष्ट्रातील महिलांना सरकारने 7 हजार कोटींचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. गडचिरोली गावात अनेक कामांचे भूमिपूजन केले आहे. मार्कंडेय देवस्थानाला मोठा निधी दिला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या आराध्यस्थानाचे भूमिपूजन होत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे चित्र बदलण्याचे काम सरकार करीत आहे, असे ते म्हणाले. देशाची स्टील सिटी गडचिरोली होऊ शकते, इतकी क्षमता जिल्ह्यात आहे. महिलांना येथे रोजगाराची संधी मिळत आहे. बाहेरच्या लोकांना गडचिरोलीत उद्योगात असलेला रोजगार हिसकावू देणार नाही. स्टील उद्योगात विदर्भातील लोकांना रोजगार द्यायला लावू. गडचिरोलीचा विकास नक्की होईल, पण त्यासाठी जल, जमीन आणि जंगल याला कुठेही नुकसान करू देणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. जिल्ह्यात लवकरच विमानतळ आणि मेडिकल कॉलेजसाठी प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले.

Edited by : Atul Mehere

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT