Eknath Shinde Gadchiroli : गडचिरोलीला लवकरच मिळणार दोन मोठे गिफ्ट; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

CM Eknath Shinde On Gadchiroli Airport And Medical College : गडचिरोलीच्या विकासासाठी मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा...
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama

Eknath Shinde On Gadchiroli District :

गडचिरोली जिल्ह्याची मागास, दुर्गम, माओवादग्रस्त ही ओळख कायमची पुसून टाकायची आहे. त्यासाठी लवकरच जिल्ह्यात विमानतळ आणि मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय बसस्थानकांवर महिलांना स्टॉल देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता. 9) ही घोषणा केली. येथे आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी मंचावर उपस्थित होते. मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले. मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी गडचिरोलीचा चेहरामोहरा बदलला. आपण गडचिरोलीचे पालकमंत्री असतानाही जिल्ह्यासाठी प्रयत्न केले. आता राज्यातील महायुती सरकार गडचिरोलीचा कायापालट करून दाखवेल, असे ते म्हणाले.

Eknath Shinde
Ajit Pawar Meeting : बैठका घेण्यातही अजित पवारांची 'दादा'गिरी; जिल्हाधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठकांचा धडाका

महिलाभगिनी अनेक स्वप्न उराशी बाळगत असतात. अनेकांची ही स्वप्ने अपुरी राहतात. या स्वप्नांना बळ देण्याचे काम राज्य सरकार करणार आहे. समाज पुढे नेण्यासाठी स्त्री सक्षम असली पाहिजे. मागील दीड वर्षापासून सरकारने महिला कल्याण व उन्नतीसाठी अनेक पावले उचलली आहेत. गडचिरोलीसारख्या भागात मोठ्या संख्यने महिला उपस्थित होणे हा स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनंतर प्रथमच घडत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मागास जिल्हा म्हणून गडचिरोलीची ही ओळख कायमची पुसायची आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी गडचिरोलीसाठी खूप प्रयत्न केले. गडचिरोलीचा विकास करण्यासाठी लोकांना काम मिळाले पाहिजे. जिल्ह्यात विविध प्रकल्प सुरू झाल्याने 10 हजार लोकांना काम मिळणार आहे. भविष्यात हजारो लोकांना काम मिळणार आहे. स्थानिकांना त्यांना रोजगार मिळावा हाच सरकारचा प्रयत्न असेल. रोजगारविषयक प्रशिक्षण देण्यासाठी सेंटर सुरू झाले आहे. त्यात आदिवासी लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही शिंदे यांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गडचिरोलीत महिला आणि मुलींना सुमारे 7 ते 8 किलोमीटर पायी चालावे लागत होते. आता त्यांना 10 हजार सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकार लोकाभिमुख आहे. सरकार त्यागाचे प्रतीक म्हणून महिला-भगिनींकडे पाहते. महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत. महिला सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित सुरू राहते. सरकार महिलांची आरोग्य तपासणी करीत आहे. शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लोकांना फायदा होत आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.

महिलांच्या हाताला काम देण्यासाठी सरकार योजना राबवत आहे. त्यासाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यातून 5 हजार तरुणींना प्रशिक्षण देऊन नोकरी देण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्याचा विकास करून दाखविल्याशिवाय सरकार राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

edited by sachin fulpagare

R...

Eknath Shinde
Sunil Kedar : सुनील केदार यांना मोठा दिलासा! उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com