Nana Patole-Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis : काँग्रेसच्या पटोलेंचा पुन्हा तोच प्रश्न; मग 'सीएम' फडणवीसांनीही दिलं भन्नाट उत्तर

Nagpur Winter Session 2024 : महायुतीमध्ये सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपावरून घमासान सुरू आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे अनेक नेते नाराज झाले आहेत. छगन भुजबळ हिवाळी अधिवेशन सोडून नाशिकमध्ये निघून गेले आहेत.

Rajesh Charpe

Nagpur News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर दोन दिवसात खाते वाटप केले जाणार असल्याची घोषणा केली होती. यास आता तीन दिवस उलटून गेले. अर्धे हिवाळी अधिवेशन उलटून गेले आहे. मात्र, खातेवाटपाचा तिढा सुटला नाही.

हाच धागा पकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी विधानसभेत उपस्थित मुख्यमंत्री फडणवीस यांनी, नाना तुमच्याशी चर्चा केल्याशिवाय खातेवापट करणार नाही असे सांगून हा मुद्दा टोलावला. त्यामुळे एकच हशा पिकला.

महायुतीमध्ये सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपावरून घमासान सुरू आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे अनेक नेते नाराज झाले आहेत. छगन भुजबळ हिवाळी अधिवेशन सोडून नाशिकमध्ये निघून गेले आहेत. त्यांनी अजित पवार यांच्याविरोधात मोहीमच उघडली आहे. दुसरीकडे मी नाराज नाही, असे सांगता भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार रोजच आपली नाराजी व्यक्त करीत आहेत. यामुळेच खातेवाटपही रखडले असल्याचे दिसत आहे.

गृह, वित्त आणि नगर विकास खात्यावरून महायुतीत मोठी रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे खातेवाटप जाहीर करण्यास टाळाटाळ केली जात आहे. अधिवेशनात मंत्री आहेत पण त्यांच्याकडे खातेच नाही अशी परिस्थिती आहे. अधूनमुधून आमच्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार अशी विचारणा होत असते. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर मुख्यमंत्री सक्षम आहे आणि उत्तरे देण्याची सरकारची सामूहिक जबाबदारी असते सांगून वेळ मारून नेत आहे.

आज विधानसभेत चर्चा सुरू असताना तालिका अध्यक्ष चैनसुख संचेती यांनी चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख संसदीय कार्यमंत्री असा केला. त्यामुळे नाना पटोले यांना सरकाराला कोंडीत पकडण्याची आयतीच संधी मिळाली. त्यांनी लगेच तुमचे खातेवाटप झाले असेल तर ते जाहीर करण्याची विनंती केली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांनी लगेच उठून नाना तुमच्याशी चर्चा केल्याशिवाय खातेवाटप केल्याशिवाय चर्चा करणार नाही असे सांगून त्यांच्या प्रश्नातील गांभीर्यच काढून घेतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT