Bhagyashree Atram vs Dharmarav Baba Atram  Sarkarnama
विदर्भ

Dharmarao Baba Atram: मुलीने तुतारी हाती घेतली; मंत्री धर्मराव बाबांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'घोडा मैदान जवळ...'

Dharmarao Baba Atram daughter joins NCP (SP) : 'घर फुटू नये यासाठी बरेच प्रयत्न केले. पवारसाहेबांनाही घर फोडू नका अशी विनंती केली होती. आता घर फुटलेच आहे. जे झाले ते झाले', असेही धर्मराव बाबा आत्राम म्हणाले.

Rajesh Charpe

Nagpur News : भाग्यश्री आत्राम यांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्या विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर आता बाप- लेकीमध्ये शाब्दिक वॉर सुरू झाले आहेत.

राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी मुलीच्या टीकेला उत्तर दिले आहे. तिने नवीन वडील शोधले आहे, ते काय करतात ते बघू, घोडा मैदान जवळ असल्याचे सांगून शरद पवार यांनाच आव्हान दिले आहे.

मंत्री धर्मराव बाबा आत्राम( Dharmarao Baba Atram) यांच्या मुलीने गुरुवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गुरुवारी प्रवेश घेतला. यावेळी त्यांनी आपण वडिलांना का सोडले हे सांगताना बाबा आत्राम यांच्या कार्यशैलीवर टीका केली.

भाग्यश्री आत्राम म्हणाल्या, अनेक वर्षांपासून त्यांनी अहेरी मतदारसंघासाठी काहीच केले नाही. मला आणि मतदारांना गाजर दाखवले. मतदारसंघातही ते कधी फिरकत नाही. येतात आणि जातात. एवढचा त्यांचा मतदारसंघाशी संबंध आहे. आपणच अहेरी मतदारसंघाची जबाबदारी पार पाडत आहे. आता पराभवाच्या भीतीने ते युवकांना रोजगाराचे आमिष दाखवत आहेत. सूरजागढ इस्पात कंपनी बोगस आहे. फ्रॉड लोकांची संचालक म्हणून कंपनीवर नियुक्त केले आहे असाही आरोप आत्राम यांनी केला.

या भाग्यश्री आत्राम (Bhagyashree Atram) यांच्या टीकेला बाबा आत्राम यांनी मुलीला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, घर फुटू नये यासाठी बरेच प्रयत्न केले. पवारसाहेबांनाही घर फोडू नका अशी विनंती केली होती. आता घर फुटलेच आहे. जे झाले ते झाले असेही धर्मराव बाबा आत्राम म्हणाले.

धर्मराव बाबा आत्राम म्हणाले, तिने नवीन पक्ष, नवीन काम हातामध्ये घेतले. यातून काहीतरी चांगले घडेल असे ते म्हणाले. माझ्या बाबात भाग्यश्री काय बोलली ते मी ऐकले नाही. जे काही ऐकले ते तोंडी आहे. आता तिचा आणि माझा मार्ग वेगळा आहे. त्या वेगळ्या पक्षात आहेत. त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो.

माझ्या विरोधामध्ये जिंकून आली पाहिजे हीच अपेक्षा करतो. लोकसभा मतदारसंघ असो वा विधानसभा मीच फिरत असतो. सगळी कामे मीच करतो. अहेरी मतदारसंघाचे मतदान काय ते ठरवेल. येत्या दोन महिन्यातच जनता निर्णय देईलअशी थेट प्रतिक्रिया आत्राम यांनी दिली आहे.

नवीन पिढीत स्फूर्ती असते. त्यांना काहीतरी करायचे असते. परंतु बोलत असताना सर्व मान मर्यादा सांभाळाच्या असतात असाही सल्ला त्यांनी भाग्यश्री आत्राम यांना दिला. मी पन्नास वर्षांपासून राजकारणात आहोत. भाग्यश्रीला आठच वर्षे झाली. तिला अजून बरेच काही शिकायचे आहे असे सांगून बाबा आत्राम यांनी मी गडचिरोलीत असतो असाही टोला लागवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT