Solapur, 12 September : आगामी विधानसभा निवडणुकीत मला महाविकास आघाडीतून सोलापूर शहर मध्य मतदार संघाची जागा सुटावी, यासाठी सीताराम येचुरी यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. माझ्या उमेदवारीच्या अनुषंगाने येचुरी हे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या घरी गेले होते. परंतु अचानक भोवळ आल्याने त्यांच्या दारातच येचुरी कोसळले.
उपचारानंतर ते बरे होऊन पक्ष कामाला लागले होते. मात्र, अचानकपणे प्रकृती बिघडल्याने पुन्हा येचुरी यांना ‘एम्स’मध्ये दाखल करावे लागले. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली, हे सांगताना माजी आमदार नरसय्या आडम यांना आश्रू अनावर झाले होते.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कॉम्रेड सीताराम येचुरी (Sitaram Yechury ) यांचे आज दिल्ली आम्ही सोनिया गांधी यांच्या घरी गेले होते. पण ते दारातच कोसळले. त्यावेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले.
त्यानंतर ते बरे होऊन नेहमीप्रमाणे दिल्लीच्या पक्ष कार्यालयात दैनंदिन कामाला सुरुवात केली होती. मात्र पुन्हा अचानक प्रकृती बिघाड झाल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आजअखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असे आडम यांनी नमूद केले.
नरसय्या आडम (Narsayya Adam ) म्हणाले, कॉ. सीताराम येचुरी आणि माझे 1995 पासून अत्यंत जवळकीचे संबंध निर्माण झाले. माकपचे राज्य सचिव आणि केंद्रीय समिती सदस्य पदावर संधी देण्यात येचुरी यांची मोलाची भूमिका होती. सोनिया गांधी यांच्याशी वाटाघाटी करून सीताराम येचुरी यांनी मला 2004 मधील विधानसभा निवडणुकीत शहर दक्षिण मतदारसंघातून तिकीट मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
आशिया खंडातील सर्वात मोठा एकात्मिक गृहनिर्माण प्रकल्प म्हणून नावाजलेल्या कॉ. गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या घरकुल हस्तांतरण सोहळ्यास येचुरी हे मनमोहन सिंग यांना घेऊन आले होते. ‘रे’ नगरच्या निर्मितीत स्थापनेपासून १५ हजार घरकुले वितरीत होईपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्व प्रकारची मदत मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माझे आत्मचरित्र ‘संघर्षाची मशाल हाती’ या पुस्तक प्रकाशनासाठी सीताराम येचुरी स्वतः सोलापूरमध्ये आले होते. त्यांच्या हस्ते माझ्या आत्मचरित्र प्रकाशनाचा सोहळा पार पडला, तो माझ्यासाठी अत्यंत अविस्मरणीय आणि सुवर्णक्षण आहे. कारण, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची कदर करणारा असामान्य नेता म्हणून ते माझ्यासाठी सदैव स्फूर्तीस्थानी राहतील, अशी भावना आडम यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.