Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar News : अजितदादांच्या नेतृत्वातच 2024 ची निवडणूक होणार; धर्मरावबाबा यांचा दावा

Sunil Balasaheb Dhumal

Gondiya Political News : महायुतीत भाजप हाच मोठा भाऊ आहे. त्यामुळे मोठ्या भावाला अनेक तडजोडी कराव्या लागतात, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाची राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जात आहेत. यातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्री होणार आहेत, तर त्यांच्याच नेतृत्वाखाली २०२४ ची निवडणूक लढवली जाणार असल्याचे अन्न पुरवठा नागरी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दावा केला आहे. आत्रामांच्या या विधानाने भाजपसह शिंदे गटात अस्वस्थता पसरण्याची चिन्हे आहेत. (Latest Political News)

राष्ट्रवादीचा अजित पवार (Ajit Pawar) गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, त्यांच्याच नेतृत्वाखाली आगामी निवडणुका लढवल्या जातील, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी वारंवार दिलेले आहे. असे असतानाही फडणवीस यांच्या ताज्या विधानाचा संदर्भ देत गोंदियाचे नवनियुक्त पालकमंत्री आत्राम यांनी अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील असे विधान केले. आत्रामांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपसह शिंदे गट नाराज होण्याची शक्यता आहे.

अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिंदे गटासह भाजपमध्येही नाराजी पसरल्याचे स्पष्ट झाले होते. पवार गटामुळे आपली मंत्रिपदाची संधी हुकल्याची भावना शिंदेंसह भाजपमध्येही आहे. त्यातच पवारांच्या शिलेदारांना शेलक्या खात्यांची मंत्रिपदे मिळाली. तसेच आता त्यांना हव्या असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपदेही देण्यात आली. यात आत्रामांनी केलेल्या अजितदादा मुख्यमंत्री होणार आणि आगामी निवडणुकाही त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जाणार आहेत. या विधानामुळे महायुतीत पुन्हा राळ उठण्याची चिन्हे आहेत. यावरून यापूर्वी उठलेला धुरळा शमवताना फडणवीस यांच्यासह पवारांच्याही नाकीनऊ आले होते. (Maharashtra Political News)

धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, "अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार आहेत. तसेच मराठा चेहरा म्हणून त्यांच्याचे नेतृत्वाखाली महायुती आगामी निवडणुका लढवणार आहे. महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या जागा शंभर टक्के निवडून आणण्याची तयारी झालेली आहे. तसेच मिळालेल्या जागांवर सीट वाटप करताना उमेदवारांची निवडून येण्याची क्षमताच तपासली जाणार आहे. जास्तीत जास्त जागा निवडून आणून अजित पवार पुढचे मुख्यमंत्री असतील," असेही आत्राम यांनी स्पष्ट केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT