Beed NCP News : शरद पवार गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल, नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून 15 लाखाची खंडणी

Beed Politics : शेख मंजूर यांनी धमकी देऊन फसवणूक केल्याची तक्रार शिवहर शेटे यांनी केली आहे.
Beed NCP News
Beed NCP News Sarkarnama
Published on
Updated on

Beed : माजलगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांच्यावर बीडच्या माजलगाव शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपालिकेचे कर्मचारी शिवहर शेटे यांना 15 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. शेख मंजूर हे माजलगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरद पवार गट) व माजी नगराध्यक्ष आहेत.

शेख मंजूर यांच्यावर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने बीड, माजलगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 14 फेब्रुवारी 2019 रोजी हा माजलगाव नगरपालिकेत हा प्रकार घडला होता. शेख मंजूर यांनी धमकी देऊन फसवणूक केल्याची तक्रार शिवहर शेटे यांनी केली आहे. यावरून ही कारवाई करण्यात आली.

Beed NCP News
Eknath Shinde News : विकासकामांना स्थगिती देऊन सरकार नक्की कोणाची प्रगती करणार होते? जयंत पाटलांचा सवाल

माजलगाव नगरपालिकेत शिवहर शेटे यांना शेख यांनी काही कामे करण्यास सांगितले होते. "नियमात बसत असेल तरच काम करेल," असे शेटे यांनी शेख मंजूर यांना सांगितले होते. त्यावरून वाद झाला. "तू सामान्य कर्मचारी आहे, तुझी वाट लावतो. माझे न ऐकल्यास तुला जीवे मारील, अशी धमकी शेख मंजूर यांनी दिली होती.

त्यानंतर तत्कालीन नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी दोघांनाही बोलवून घेतले. चाऊस यांच्यासमोरही 'हा माझे काम कसे करीत नाही, त्याचा काटा काढील. त्याला निंलबित करेन, त्याच्या तक्रारी करीन, अन्यथा मला 15 लाख रुपये देण्यास सांगा," अशी धमकी मंजूर यांनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Beed NCP News
Sanjay Raut News : फडणवीसांसारखा खोटारडा माणूस मी पाहिला नाही; राऊतांनी डिवचलं; म्हणाले, मातेरं करून घेतलं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com