Jitendra Awhad Sarkarnama
विदर्भ

Jitendra Awhad : न्याय व्यवस्थेच्या निकालातून जातीय वास येतो असे बोललो नाही!

Criticism on Statement : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला घूमजाव

Atul Mehere

Nagpur Politics : न्याय व्यवस्थेच्या निकालातून जातीय वास येतो असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही, असा यू-टर्न घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घूमजाव केला आहे. न्याय व्यवस्थेत आरक्षण न देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 80 टक्के समाजावर अन्याय केला, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्यांच्या वादग्रस्त विधानानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर आव्हाडांनी यू टर्न घेतल्याचं दिसून येत आहे. नागपूर येथे त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले.

याबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, ‘‘मला वाईट वाटते.. न्याय व्यवस्थेत आरक्षण ठेवायला पाहिजे होते.. मी बोलत नाही कारण वाद निर्माण होतो. काही काही जजमेंट अशी येतात त्यातून जातीचा वास यायला लागतो. न्याय व्यवस्था ही नॉन बायस असली पाहिजे.. अशी संविधानाची अपेक्षा आहे. बाबासाहेबांना मिठी मारायची असेल तर प्रत्येक मानवाने मारली पाहिजे. संविधानाने सर्वांना समान संधी दिली आहे. मात्र, न्याय व्यवस्थेत आरक्षण न देऊन 80 टक्के समाजावर बाबासाहेबांनी अन्याय केला.’’

आव्हाड यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे त्यांनी आता सारवासारव सुरू केली आहे. ‘‘न्याय व्यवस्थेच्या निकालातून जातीय वास येतो असे बोललो नाही,’’ असा घुमजाव जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ‘‘मी असे म्हटलेले नाही. भाषण काढून बघा. वैचारिक लढाई ही लढाई नसते. लोकांना विचार मांडणे आवडत नाही कारण एखादा विचार मांडला की, शिव्या देत सगळे रस्त्यावर येतात’, असे आपण बोलल्याचे ते म्हणाले.

‘‘मी तो काल विषय मांडला आणि तिथेच मी तो विषय संपवलेला आहे. मी माझी शंका होती ती व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी का केले, का केले नाही हे मी सांगू शकत नाही. माझे विचार होते. ते मी मांडत असतो. समाजाला पटले तर ठीक नाही पटले तरी ठीक. माझ्या विचारांना मान्यता द्या, अशी मी कोणावर जबरदस्ती करत नाही’, असेही ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

‘‘मला अनुभव आला. मी शांत बसणारा माणूस नाही. माझ्या आईला कधीही पूजेला बोलावत नव्हते. ती माझ्या मनातील वेदना आहे. मी ती बोललो तिने कधीच आम्हाला हे सांगितले नाही. मी वाचत गेलो आणि वर्णद्वेष समजत गेलो. चातुरवर्ण समजत गेलो. तेव्हा माझ्या लक्षात आले की माझ्या आईला का बोलावले जात नाही’’, असे आव्हाड यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT