Jitendra Awhad : आव्हाड पुन्हा धमाका करण्याच्या तयारीत! सोशल मीडियावर We Are Back चे ब्रॅण्डिंग सुरू

Jitendra Awhad Thane Festival : ठाणे फेस्टिव्हलमध्ये जितेंद्र आव्हाड पुन्हा करणार धमाका?
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

पंकज रोडेकर -

Jitendra Awhad Latest News : प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, असे वादग्रस्त वक्तव्य करून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रोष ओढावून घेतला. त्यातच आता आव्हाड यांनी We Are Back असे सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू केले आहे. मात्र, संघर्ष प्रेजेन्ट्स माध्यमातून ठाणे फेस्टिव्हल 2024 असे ही म्हटले आहे.

Jitendra Awhad
Thackeray Vs Shinde : मेट्रोवरून ठाकरे विरुद्ध शिंदे गटात रंगणार 'सामना'

संघर्ष ही Jitendra Awhad यांची ओळख असून ती एक त्यांची सामाजिक संस्थाही आहे. त्यातच आव्हाडांनी We Are Back म्हटल्याने नेमके हा कार्यक्रम कधी असणार आहे. त्यामध्ये ते श्रीराम हे मांसाहारी असल्याचे पुरावे तर घेऊन येणार नाही ना?. तर ठाणे फेस्टिव्हलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी असल्याने यामध्ये यावेळी 'गीतरामायण' हा संगीतमय कार्यक्रम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदा ही संघर्ष प्रेजेन्ट्स ठाणे फेस्टिव्हल कार्यक्रम लवकर होणार आहे. हा संगीतमय कार्यक्रम प्रामुख्याने आव्हाड यांच्या कळवा मुंब्रा मतदारसंघात होतो. या कार्यक्रमाला मोठ्या संस्थेने ठाणे, कळवा आणि मुंब्रा येथील नागरिक ही दाद देताना दिसतात. पण प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, असे वक्तव्य आव्हाडांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला केले. या वक्तव्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त झाली. येवढेच नाहीतर त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आव्हाड हे आक्रमक नेते असल्याने आणि अशाप्रकारे अनेकदा विधाने करून ते नाराजीला सामोरे गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हे नवीन असे काही नाही. त्यातच अशाप्रकारे गुन्हा दाखल झाल्यावर यामध्ये त्यांना अटक किंवा शिक्षा होईल की नाही? हे सांगता येत नाही. तसेच सत्तेत आल्यावर असे गुन्हे राहतात की नाही हे त्यांनाच माहिती असेल. हा वादंग अजून किती दिवस सुरू राहील हे सांगता येत नाही. पण, आव्हाडांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या इंग्रजीत अक्षरात ते We Are Back असे म्हणून राजकीय पक्षांना तयार राहा, असे तर म्हटले नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.

फेस्टिव्हल हा ठाणे फेस्टिव्हल नावाने असल्याने त्यामध्ये फक्त संगीताची मेजवानी असणार हे मात्र तितकेच खरे आहे. मात्र, ही मेजवानी ग दि माडगूळकरांच्या 'गीतरामायण' याची असण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे back म्हणणारे आव्हाड नेमका कोणता धमाका घेऊन येतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

edited by sachin fulpagare

Jitendra Awhad
Mumbra News : अजितदादा गटानं आव्हाडांच्या बालेकिल्ल्यातच लावला सुरुंग; चक्रव्युहात अडकवलं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com