Uddhav Thackeray, Aaditya Thackeray, Sharmila thackeray  Sarkarnama
विदर्भ

Uddhav Thackeray News : असे काय घडले? उद्धव यांनी जाहीरपणे मानले शर्मिला ठाकरेंचे आभार

Sachin Fulpagare

Maharashtra Assembly Winter Session 2023 : दिशा सालियन प्रकरणात राज्य सरकारने एसआयटी चौकशी लावली आहे. या प्रकरणी चौकशीही सुरू झाली आहे. या चौकशीवरून नागपुरात हिवाळी अधिवेशनातील आणि राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे. दिशा सालियन प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि नेते आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी गंभीर आरोप केला. त्यानंतर एसआयटी चौकशी लावण्यात आली. आता या एसआयटी चौकशीवरून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला सवाल केला आहे.

उद्धव ठाकरे शर्मिला ठाकरेंना म्हणाले...

शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट ) उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आहेत. या अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दिशा सालियन प्रकणावर शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंची पाठराखण केल्याबाबत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले आहे. 'त्यांनी पहिले एकमेकांत बोलावं. मात्र, मी त्यांचा आभारी आहे. कुठलाही संबंध नसताना तुम्ही एसआयटी चौकशी लावता. मग आमच्याकडे पुरावे असतानाही तुम्ही एसआयटी का लावत नाही? मला याचाच राग आहे. आमच्याकडे फोटोही आहेत', असे उद्धव ठाकरे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

शिवसेना ठाकरे गटाने मुंबईत शनिवारी धारावी बचाव मोर्चा काढला होता. या मोर्चावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली. सेटलमेंट न झाल्यामुळे धारावीतील मोर्चा काढण्यात आल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरेंना टोला लगावला. अदानीचे चमचे कोण कोण आहेत, हे आता कळलेले आहे. आम्ही प्रश्न अदानीला विचारलाय. पण चमचे का वाजतायेत. आंदोलनाला जे जातात त्यांना विषय काय हेच माहिती नसते. अर्धवट माहितीच्या आधारावर प्रश्न विचारू नये. विमानाला कुठेही टोल लागत नाही. त्यामुळे हा विषयही तिथे येत नाही. अर्धवट माहितीवरून प्रश्न विचारू नये. एकतर त्या शालिचे वजन पेलते की नाही हे बघायला पाहिजे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना लगावला.

काय म्हणाल्या होत्या शर्मिला ठाकरे?

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर शर्मिला ठाकरे यांना काही दिवसांपर्वी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी शर्मिला ठाकरे यांनी आदित्यची पाठराखण केली होती. आदित्य असे काही करेल असे वाटत नाही, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT