Disha Salian Case : आदित्यची पाठराखण करणाऱ्या शर्मिला ठाकरेंना नारायण राणेंचे आवाहन; म्हणाले...

Disha Salian Case Narayan Rane To Sharmila Thackeray : नारायण राणे शर्मिला ठाकारेंना काय म्हणाले?..
Narayan Rane
Narayan Rane Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics News : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून राजकारण तापले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी राज्य सरकारने SIT चौकशीची घोषणा केली आहे.

Narayan Rane
Aditya Thackeray Challenge : 'असेल हिंमत तर वरळीतून लढा, नाहीतर मी ठाण्यातून..' : आदित्य ठाकरेंचे शिंदेंना ओपन चॅलेंज!

दिशा सालियन ही अभिनेता सुशांत राजपूत यांची आधी मॅनेजर होती. सुशांत राजपूतचाही मृत्यू झाला आहे आणि दिशा सालियनचाही. या दोघांच्या मृत्यूवरून राजकारण रंगले. आता दिशा सालियन प्रकरणी राज्य सरकारने 4 दिवसांपूर्वी SIT चौकशीचे आदेश दिले. यावरून आदित्य ठाकरेंना टार्गेट केले जात आहे. आदित्य ठाकरे असे काही करेल, असे वाटत नाही, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या होत्या.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप झाल्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी त्यांची पाठराखण केली. शर्मिला ठाकरे यांच्या वक्तव्यावरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांना सवाल केला आहे. पुरवा असेल तर दाखवा, असे नारायण राणे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपण कुणाच्याही वक्तव्यावर प्रतिक्रिया देणार नाही. त्यांच्याजवळ (शर्मिला ठाकरे ) पुरावा असेल तर, त्यांनी तो सादर करावा. आदित्य ठाकरे साधा मुलगा आहे. असे काही करणार नाही. आदित्य सकाळी उठून देवाचे नाव घेतो. दिशा सालियन प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. आता या चौकशीतून सर्व बाहेर येईल, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेला तुरुंगात जावेच लागेल, असे वक्तव्यही यापूर्वी नारायण राणे यांनी केले होते.

Narayan Rane
Aaditya Thackeray : "...म्हणून फोटोसेशनला आलो नाही!"; आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com