Yashomati Thakur Criticised BJP : भारतीय जनता पक्ष आणि नथुराम गोडसे यांचा DNA एकच आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केली. यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये वादाची नवी ठिणगी पडण्याची शक्यता आहे. त्याला कारणही तसेच आहे. भाजपने काल ट्विट करत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना रावणाच्यारूपात दाखवले होते. त्यानंतर आज यशोमती ठाकूर यांनी नथुराम गोडसेंच्या मुद्द्यावरून भाजपला प्रत्युत्तर दिले. पण यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकारण तापण्याची शक्यता आहे.
"भाजपचा DNA आणि नथुराम गोडसेंचा DNA एकच आहे. गोडसेंनी महात्मा गांधींनाही रावणाचं रूप दिलं होतं. त्यांनी महात्मा गांधींना मारायचा प्रयत्न केला. संघ आणि भाजप हे सातत्याने असंच काहीतरी करत असतात.
पण गांधी त्या युगातले असोत, की या युगातले असो गांधी हे गांधी आहेत. या देशाचा मूळ डीएनए गांधी हाच आहे. त्यांनी कितीही मारण्याचा प्रयत्न केला तरी गांधी मरणार नाहीत. पण सत्ताधाऱ्यांच्या डोक्यामध्ये जी विकृती आहे. ती नष्ट झाली पाहिजे. यासाठी येत्या दसऱ्याला त्याचं दहन झालं पाहिजे, असा आमचा आग्रह असल्याचेही यशोमती ठाकूर यांनी म्हटलं. गुजरात असो वा आपला देश असो, त्यांनी सातत्याने हेच केलं आहे. निवडणूक कोणतीही असो, ते काय गोंधळ घालतील आणि विभाजन करायचा प्रयत्न करतील याचा नेम नाही. ते हे करू शकतात, त्यांच्याच पक्षातील काही मंडळी हे बोलत आहेत. ही वास्तविकता आहे. मागेही अशा गोष्टी घडल्या होत्या.
वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत यावं का,असा प्रश्न त्यांना विचारला असता, यशोमती ठाकूर म्हणाल्या, हो जरूर प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीत आलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. इतकेच नव्हे, तर इंडिया आघाडीतही त्यांनी असावं, अशी आमची इच्छा आहे.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.